कंधार ; प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी शेतीमालाचे भाव पडल्यामुळे हवालदिल झाला असून
त्यातच आता अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे . त्याबद्दल अर्थसंकल्पात शेतक-यांना थेट मदत न करता केवळ वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच होय. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा चा पाऊस
आहे वास्तव काहीच नाही अशी प्रतिकिया आज सादर झालेल्या अर्थसंकल्पा बद्दल
माजी आमदार तथा राष्ट्रवादी किसान सभा प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी माध्यमांना दिली .
शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विकासाचा पंचामृत कोणीही पाहीलेला नाही अशीही प्रतिक्रिया माजी आमदार तथा राष्ट्रवादी किसान सभा प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी देत नाराजी व्यक्त केली .