माळाकोळी ; एकनाथ तिडके
सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथे पक्षाच्या बैठकीच्य निमित्ताने गेले असताना माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पक्षाच्या बैठकीत सुद्धा मूग उडीद या धान्यांना किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करण्याचा विषय उपस्थित केला , यावेळी प्रदेशाध्यक्ष व इतर वरिष्ठ नेत्यांनी सदर विषयावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे मत गांभीर्याने ऐकत तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले,
यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांना निवेदन देऊन मूग उडीद या धान्यांना आधारभूत किंमत देऊन राज्य शासनाने तातडीने खरेदी करावी अन्यथा व्यापारी ओलावा व इतर कारणे दाखवत शेतकऱ्यांचीची लूट करू शकतात , त्यामुळे मूग उडीद या धान्यांची आधारभूत किमतीने खरेदी करणे ही ही शासनाची जबाबदारी आहे , ही जबाबदारी पार पाडत अतिवृष्टी व इतर संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देणे आवश्यक आहे अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली.
यावेळी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत सरकार तातडीने योग्य पावले उचलेल असा विश्वास माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी अण्णा पुन्हा सक्रिय…..
पूर्ण हयातभर शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नासाठी लढणारे शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे मागील काळात सक्रिय राजकारणातून काहीसे अलिप्त असल्या कारणाने चर्चा होत असतानाच ! शेतकऱ्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत मूग उडीद या धान्यांची आधारभूत किमत देऊन सरकारने खरेदी करावी ही मागणी सरकारला करत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे,
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असल्यामुळे तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर शंकरआण्णा धोंडगे यांच्या शब्दाला महत्त्व असल्यामुळे या विषयात सरकार निश्चितपणे लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यात शंका नाही , मात्र मूग उडीद धान्यांच्या आधारभूत किंमत किमतीने धान्य खरेदी करण्याच्या मागणीमुळे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.