साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार फंडातून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता गोड करुन मातंग समाजाला न्याय दिला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी मातंग समाजाच्यावतीने माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली दि. 15 डिसेंबर 2019 रोजी विद्यापीठाचे कुलगुरु उध्दवराव भोसले यांची भेट घेवून मागणी करण्यात आली होती.
या शिष्टमंडळात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु भोसले यांनी अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र विद्यापीठात स्थापन करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. हे अध्यास व अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचे कुलगुरुंनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी होत असतानाही विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होवू शकली नाही. राज्यातील सत्ताधार्यांना अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे गांभीर्य नसल्यामुळे विद्यापीठात अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी पूर्ण होवू शकली नाही. म्हणून मातंग समाजाच्यावतीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली खा.चिखलीकर यांची दि.30 ऑगस्ट 2020 रोजी भेट घेवून अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
माजी आमदार अविनाश घाटे यांनी मातंग समाज शिष्टमंडळाच्यावतीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यात सत्तांतर होवून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. या सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात जन्मशताब्दी वर्षे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. राज्यसरकारमध्ये सत्तेत वाटा मिळविलेल्या तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी मातंग समाजाला न्याय न देता जन्मशताब्दी वर्षाची उद्या सांगता होत असताना घोर निराशी केली आहे.
त्यामुळे जन्मशताब्दी वर्षाची सांगता गोड करुन मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आज आपण सर्वजण खा.चिखलीकर यांना भेटण्यासाठी आलो आहोत.खा.चिखलीकर यांनी शिष्टमंडळाच्या भावना लक्षात घेवून तात्काळ माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे तात्काळ संपर्क साधून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार’ देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी केली. भ्रमणध्वनीव्दारे देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार अविनाश घाटे यांच्याशी चर्चा करुन आपण अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली नसली तरी आपला खासदार या नात्याने विद्यापीठात हे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार फंडातून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा करुन खा.चिखलीकर यांनी जिल्हाधिकार्यांच्या नावाने नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरु करण्यात येणार्या (इमारत बांधकाम) अध्यासन व अभ्यास केंद्र (ग्रंथ खरेदी) सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे पत्र अविनाश घाटे यांच्या हाती सुपूर्द करुन अण्णभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता खा.चिखलीकर यांनी गोड करुन मातंग समाजाला न्याय दिले.
खा.चिखलीकर यांनी मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल समस्त समाजाच्यावतीने अविनाश घाटे यांनी जाहिर आभार मानले.या शिष्टमंडळात माजी आमदार अविनाश घाटे, मारोती वाडेकर, एम.बी.उमरे, बालाजीराव थोटवे, गंगाधरराव कावडे, गोपाळराव टेंभूर्णे, राजू मंडगीकर, गणपतराव गायकवाड, दशरथ कांबळे, रामदास कांबळे, यादव नामेवार, संभाजी गायकवाड, एन.जी.कांबळे यडूरकर, शंकरराव भंडारे, डो.ई. गुपिले, आर.जे.वाघमारे, मधुकर गोविंदराव वाघमारे, उत्तम बाबळे, पिराजी गाडेकर, रविंद भालेराव, शिवराज केदारे, प्रा.सुर्यवंशी एस.सी. माणिक कांबळे, निरंजन तपासकर, एस.एन.जांभळीकर, राजकुमार केदारे, डी.जी.गायकवाड, मल्हारराव वाघमारे, बी.एम.जाधव, तलवारे नितीन, आनंद वंजारे, हिरप्रसाद सोमपारी, डि.डी.गायकवाड, मारोती वाघमारे, भारत खडसे, वामन कोंगे, उत्तम वाघमारे, अॅड. बी.आर.कलवले, इंगळे चांडोळीकर आदिंची उपस्थिती होती.