गऊळ येथे संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

 

शंकर तेलंग
गऊळ ;

गऊळ तालुका कंधार येथील श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भुमित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गऊळ नगरीमध्ये श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आला होता.
आज काल्याचे किर्तन श्री ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे पाटील आळंदीकर यांचं कीर्तन झालं. त्या महाराजांनी आपल्या वाणीतून भक्तांना कुणाचा आवमान करू नका विचारसरणी उच्च असावी आई-वडिलांची सेवा हीच. ईश्वर सेवा आहे. देव भक्तीचा भुकेला आहे. पैसा धनसंपत्ती काही मागत नाही. जमल तशी सेवा करावी अशा अनेक मोलाचे संदेश या कीर्तनातून महाराजांनी भक्तांना दिले .

 

आजच्या महाप्रसादाच्या अन्नदाते डॉ. भगवान पितळे यांचे होतं गऊळ पंचक्रोशीतील भावी भक्ताने कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *