शिक्षण विभाग व डायट नांदेड तर्फे आयोजित तालुक्यातील मुख्याध्यापकांचे सक्षमीकरण प्रशिक्षणास कंधार येथे प्रतिसाद –  गटशिक्षणाधिकारी मधुकर मोरे यांची माहिती

 

कंधार ; प्रतिनिधी

स्टार्स प्रकल्प अंतर्गत कंधार येथील कै . वसंतराव नाईक बचत भवन सभागृह येथे दिनांक 10 मार्च रोजी कंधार तालुक्यातील खाजगी व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांचे एकदिवशीय सक्षमीकरण प्रशिक्षण  घेण्यात आले अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मधुकर मोरे यांनी दिली .

  प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे यांची यावेळी उपस्थिती होती .त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले . प्रशिक्षणानंतर आढावा घेण्यात आला मुख्याध्यापकांच्या जबाबदारी व कर्तव्य काय आहेत ,तसेच शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सदरील प्रशिक्षण असून शिक्षण विभाग व नांदेड डाएट मार्फत सदरील कार्यक्रम असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत धुमाळे यांनी दिली .प्रशिक्षण कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी भेट दिली .

केंद्रप्रमुख  एन.एम. वाघमारे,शिवाजी कनोजवार,ओमप्रकाश यरमे ,ज्ञानेश्वर चाटे,सिद्धेश्वर मलगिलवार,प्रदधूनर्सिंग काळे आदीं सह गट साधन केंद्र येथिल कर्मचार्यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *