मुखेड (ता.प्र )
मुखेड तालुक्यातील कर्णा येथील कु.स्नेहशिल गवळे हिने बीएएमएसची परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बीएएमएस ची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. तिचे वैद्यकीय शिक्षण आयुर्वेदिक महाविद्यालय (ता.खेड, जि.रत्नागिरी) येथे झाले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कु.स्नेहशिल गवळे ही कर्णा ता.मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गुरुदेव विद्या मंदिर, मुखेड येथे झाले. माध्यमिक शिक्षण शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय, मुखेड, तर उच्च माध्यमिक शिक्षण कै.भोरे विद्यालय, पाडळी, ता.जांमखेड जि.अहमदनगर येथे झाले आहे. मुगाव तांडा, तालुका नायगाव येथील शिक्षक गौतम गवळे यांची ती मुलगी आहे. कु.स्नेहशिल गवळे हिने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून घवघवीत यश संपादन केले आहे. कु.स्नेहशिल हिने आपल्या यशाचे श्रेय आई संगीता गवळे, वडील गौतम गवळे आदींसह सर्व चुलते, आत्या व मामांना दिले आहे.
कर्णा या गावातील पहिली महिला डाॅक्टर झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल कर्णा गावचे सरपंच माधव गवळे, पोलिस पाटील व्यंकटराव खाडेकर, अंतेश्वर गवळे गुरुजी, सुदामराव गवळे, बाबुराव गवळे, किशनराव गवळे, जितेंद्र गवळे, संभाजी सोमवारे, अविनाश साखरे आदींसह अनेकांनी अभिनंदन करुन कौतुक केले आहे.