कंधार /प्रतिनिधी
यावर्षीच्या सन 2023- 24 वर्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोहा कंधार मतदार संघातील कंधार तालुक्यातील नवीन रस्ते व पूल बांधणीसाठी च्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अधिवेशनात केली होती,
कंधार तालुक्यातील दळणवळणासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानसपुरी ते बाचोटी या भागातील रस्त्याची सुधारणा करण्यासाठी व बाचोटी गावाजवळील डोंगराची घाट कटिंग करून रस्ता सुरक्षित करणेसाठी व बारूळ गावातील नामदेव महाराज मठ संस्थान ते बारूळ कॅम्प या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे या कामासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सोनखेड- बारूळ -पेठवडज- मुखेड या अत्यंत महत्त्वाच्या राज्य रस्त्यावरील बारूळ येथील प्रसिद्ध महादेव मंदिरापासून पेठवडज कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उर्वरित बांधकामासाठी 7.50 कोटी रुपयाला मंजुरी मिळाली आहे,
तसेच पानभोसी- पांगरा- खुड्याची वाडी व लाट खुर्द या गावांना जोडणारा राज्यमार्ग 449 या रस्त्याच्या उर्वरित भागांची बांधकाम करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तालुक्यातील चिखली गावाजवळील पुलाच्या पोचमार्गाचे बांधकाम करण्यासाठी 1.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, चिखली व दही कळंबा या गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 6 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत ,असा कंधार तालुक्यात एकूण 35 कोटी 90 लक्ष रुपयाचा निधी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाल्यामुळे वरील रस्त्यांची व पुलांची कामे दर्जेदार होणार असून जिल्हा मुख्यालय मुख्यालय व तालुका मुख्यालयाला जाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना जलद व सुरक्षित मार्ग उपलब्ध होणारा असून तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुलभरीत्या बाजारपेठ व दळणवळणाची दर्जेदार सुविधा या नवीन रस्ते व पुलामुळे होणार असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले,
वरील गावातील नवीन रस्ते व पुलाच्या कामासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांनी शासनाकडून 35 कोटी 90 लक्ष रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्यातील जनतेकडून आमदार शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.