मिसरणबाई शेख यांचं दुःखद निधन…

 

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

मिसरणबाई सरवरसाब शेख वय १०५ वर्ष रा. फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांच आज ता.१८ मार्च २०२३ रोज शनिवारी दुपारी १:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

आज ता.१८ मार्च रोज शनिवारी रात्री ९ वाजता फुलवळ ता.कंधार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्या फुलवळ व परिसरातील गरोदर मातांच्या प्रसूती ( बाळंतपण ) करण्यात पारांगत होत्या. त्याकाळी दवाखान्याच्या म्हणाव्या तशा सुविधा नव्हत्या त्यामुळे गावातच घरीच सुरक्षित प्रसूती त्या करायच्या , त्यामुळे सर्वत्र दायीन म्हणून परिचित होत्या.

त्या सेवानिवृत्त लिपिक मौलासाब शेख , खाजासाब शेख ,चांदसाब शेख , सेवानिवृत्त कर्मचारी अमिरबाई शेख यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात तीन मुले , चार मुली, सुना ,जावई ,नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *