लोहा ; प्रतिनिधी
दोन दिवसापासून सतत होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारांमुळे लोहा, कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . त्यांची पाहणी आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली . लोहा कंधार मतदार संघातील शेतीच्या बांधा बांधाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला . तहसिलदार लोहा यांना निवेदन देण्यात आले .
एकीकडे शेतकरी पिकांची जोपासना आपल्या पोटच्या लेकरासारखे करत असताना
नैसर्गिक आपत्ती मुळे दिवाळखोर झाला आहे
या नुकसान ग्रस्त शेत-यांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.
लोहा, कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हाताला आलेली रब्बीची पिके आता उद्धवस्त झाले असून अनेक फळभाज्या व इतर महत्त्वाची पिके ज्यात हरभरा, गहू या पिकांसह उन्हाळी ज्वारी अधीसह हंगामी फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा
88 लोहा /कंधार मतदार संघाचे शिवाभाऊ नरंगले
यांच्या नेतृत्वात लोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
लोहा/कंधार तालुक्यातील अनेक गावात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना शासनाने ताबडतोब मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी आज लोहा तालुक्यातील अनेक गावात पाहनी दौरा व शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा (आर्थिक मदत) देण्यात आला.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडे अनेक तक्रार केल्या असून प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचेही बोलले जात आहे
. वेळीच शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही लोहा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे .
आज लोहा तालुक्यातील अनेक गावात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगरूळ येथे शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात आर्थिक मदत करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला
व शासन दरबारी ही मागणी लावून धरून न्याय मिळवून देण्याची हमी
यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया हाके , तालुका अध्यक्ष सतीश आनेराव, सरपंच किरण हाके, उपसरपंच नरहरी शिंदे, धोंडीबा यांनभूरे, झगन हटकर, सर्कल प्रमुख तुकाराम बेरळे, सिद्धार्थ ससाने व तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.