आंबुलगा येथे गारा मिश्रित जोराच्या पावसाने घराची भिंत कोसळून तरुण गंभीर

कंधार : विश्वांभर बसवंते

दि.१७ मार्च २०२३ रोज शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात गारा मिश्रित जोराच्या पावसाने आंबुलगा येथे पांडुरंग रघुनाथ वडजे यांच्या इमारतीची भिंत येलप्पा रायपूरे यांच्या घरावर भिंत कोसळून येथील तरुण शेतमजूर येलप्पा काशिराम रायपुरे वय ३५ वर्षे हा ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाला असून त्यास नांदेड येथील आधार या हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर जखमी तरुणाच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. सदरच्या तरुणावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने या प्रकरणाचा शासनाने तात्काळ पंचनामा करून या गरीब कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *