आज २० मार्च २०२३ बरोबर १३ वर्षापूर्वी चिन देशात चिमण्यांना नष्ट करण्याचा विडाच उचलल्या नंतर जगातील इतर देशांनी स्पॅरो डे अर्थात जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० रोजी पहिल्यांदाच साजरा केला आज १३ वे वर्ष आहे.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी आपल्या कल्पक सृजनशीलतेतून जागतिक चिमणी दिवसाचे कल्पक अक्षर चित्र साकारुन चिमणी-पाखरांचा दिवसावर कटाक्ष टाकले आहे.आज मानवास इटूकली बिचारी चिमणी प्रश्न विचारते आहे.
चिमणी दिवस साजरा करतांना,
छतावरती दाणा-पाणी ठेवाल का?
आमचे अस्तित्व इतिहासात जमा,
छोट्याशा जीवांना अभय द्याल का?