आमदार श्यामसुंदर शिंदे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

 

लोहा) प्रतिनिधी/

लोहा तालुक्यात काल शुक्रवार दिनांक 16 व 17 रोजी अवकाळी पाऊस व गारपीट होऊन तालुक्यातील विविध भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून या गारपीट व अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, टमाटे, काकडी, टरबूज ,आंबा व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल शनिवारी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला,

 

 

यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकले,लोहा मंडळ अधिकारी एस. बी अडकिने, मंडळ कृषी आर. एम भिसे, कृषी पर्यवेक्षक गच्चे, तलाठी ,ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहून आमदार शिंदे यांनी दुःख व्यक्त करत उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला व नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी आमदार शिंदे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना दिले, लोहा व कंधार तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असून अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले,

 

 

यावेळी खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, शेकापचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, सरपंच किरण हाके ,पोलीस वाडीचे सरपंच तेजराव बाजगीर, सह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *