फुलवळ परिसरातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या.. संजय भोसीकर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

फुलवळ सह परिसरात ता. १७ मार्च रोज शुक्रवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसानीची आज जिल्हा कांग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याने या परिसरातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी असे तहसीलदार कंधार यांना कळवले आहे.

 

फुलवळ सह परिसरातील शेतीतील रब्बी हंगामातील गहू , उन्हाळी ज्वारी , भुईमूग , हळद , भाजीपाला आदी पिकांचे नुकतेच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फुलवळ , मुंडेवाडी शिवारातील नुकसानग्रस्त भागाची व बाधित क्षेत्रातील पिकांची ता.१८ मार्च रोज शनिवारी जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर , तलाठी श्रीदेवी उस्तुर्गे , फुलवळ सरपंच प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे , पोलीस पाटील इरबा देवकांबळे सह अनेकांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

 

 

यावेळी त्यांच्यासोबत बसवेश्वर मंगनाळे , आनंदा पवार , वसंत मंगनाळे , संतोष स्वामी , शेषेराव मुंडे , कामाजी मंगनाळे , मन्मथ मंगनाळे , ज्ञानेश्वर मंगनाळे , कैलास डांगे , शफी शेख यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 

बोरी बु येथील मारोती खंडू व्यवहारे यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .

 

 

👆
बोरी बु येथील मारोती खंडू व्यवहारे यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *