राज्य मार्ग रस्त्याच्या मापात पाप…. चौकशीची मागणी! निकृष्ट रस्ताचे काम चक्क नागरिकांनीच थांबवले…!

 

बारुळ ; प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या बारूळ येथील रस्ता क्रमांक 255 राज्य मार्ग रस्ताचे आठ कोटी रुपयांचे सी सी रस्त्याचे काम येथील जागृत देवस्थान बारूळ महादेव मंदिर पासून ते बारूळ कॅम्प पर्यंत चालू असून रस्त्याचे खोदकाम डांबरीकरणाचे न करताच सी सी रस्ताचे काम चालू केल्याने सदरचा रस्ता नागरिकांनी निकृष्ट गिट्टी सिमेंट तसेच अतिक्रम न काढताच काम चालू केल्याने नागरिकांनी सदरचे काम थांबवले आहे कामाची तपशील नागरिकांना द्यावे याची चौकशी करावी नंतरच काम चालू करावे असे एकच मागणी होत होती त्यामुळे संबंधित गुत्तेदाराने आपले काम तिथेच थांबवले आहे
अनेक वर्षाच्या नंतर कधी नव्हे महादेव मंदिर या पर्यटन स्थळाच्या आशीर्वादामुळे बारूळ महादेव मंदिर ते बारूळ कॅम्प या एक किलोमीटर रस्त्याचे भाग्य उजळणार तसेच गेल्या अनेक वर्षांपासून होत असणारा नालीचा प्रश्न निकाली निघणार असे गावकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग च्या दुर्लक्षामुळे व संबंधित गुत्तेदाराच्या मर्जीप्रमाणे येथील काम तब्बल आठ कोटी रुपयाचे होत असलेले सुरुवातीपासूनच रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे यामध्ये सदरचे रस्त्याची खोली ही कुठे एक फूट तर कुठे दीड फूट त्यावर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आले सदरचे काम डबे करून त्यावर निकृष्ट दर्जाची डस्ट मिश्रित गिट्टी टाकण्यात आली तसेच त्याचे पाणी टाकून दबाई करणे हे चांगले करण्यात आले नाही तसेच रस्त्याच्या कामात होणाऱ्या मापामध्ये पाप ही दिसून येत आहे या संबंधित अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट होत आहे असे तक्रार करून हे अधिकारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे त्यामुळे गुत्तेदाराला बळ मिळत होते व काम चालूच होते विशेष म्हणजे अजूनही अतिक्रम हटवलेच नसूनही काम चालू केले हा सर्व प्रकार डोक्याच्या वर जाऊन अखेर 16 मार्च रोजी सायंकाळी बारूळ कॅम्प छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बारूळ महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे सी.सी सुरुवात केली त्यामुळे गावातील नागरिकांनी सदरचे काम हे निकृष्ट होत असून आधी गावकऱ्यांना इस्टिमेट दाखवा नंतरच काम चालू करा असे म्हणून सदरचे काम थांबवण्यात आले

 

* बारूळ येथील आठ कोटी रुपये सीसी रस्त्याचे काम हे बोगस होत आहे सदरचे बोगस काम सर्वच नागरिक पाहत आहे खोदकाम न करता अतिक्रम न काढता तसेच डस्ट मिश्रित गिट्टी तसेच रस्त्याच्या मापात ही पाप आहे संबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अनेक वेळा होत असलेले निकृष्ट कामाचे प्रत्यक्ष आढळून देऊनही अधिकाऱ्याच्या छुपी गुत्तेदाराला बळ मिळत असून गुत्तेदाराने हे बोगस काम सुरुवात केल्याने गावकऱ्यांनी अखेर सदरचे काम थांबवले आहे
प्रताप कांबळे
नागरिक

 

* सदरच्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करावी तसेच दोषी अधिकारी व गुत्तेदारावर कार्यवाही करून पुढील कामास तात्काळ सुरुवात करावी अन्यथा लोक स्वराज्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल
सभाजी वाघमारे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *