कंधार ; प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता शंभर फुटाचा आहे. रस्त्याच्या दोन्हीही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने हा रस्ता शंभर फुटावरून केवळ वीस फुटाचा शिल्लक राहिला आहे.सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे .गेल्या कित्येक वर्षा प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाले आहेत. या रस्त्यावरील व्यापारी व्यापाऱ्यांच्या हट्टापोटी हा शंभर फुटाचा रस्ता कमी करण्याच्या खटाटोप सध्या चालू आहे. भविष्याचा विचार करून हा रस्ता अंदाजपत्रकानुसार शंभर फुटाचाच करावा अन्यथा माजी सैनिक संघटना रस्त्यावर उतरेल असा सज्जड इशारा बालाजी चुक्कलवाड यांनी दिला आहे .
महाराणा प्रताप चौक ते स्वप्नभुमी या रस्त्याची दैनिक अवस्था झाली असुन खड्डेमय रस्ता झाला आहे.नगर पालीकेच्या वतिने वारंवार खड्डे बुजवून मलमपट्टी करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहे. रस्त्याच्या खड्डयात मुरूम टाकला असल्याने सर्वत्र धुळ पसरली असुन या धुळीमुळे नाकाचे व फोफसाचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने शंभर फुटाचा रस्ता केवळ 20फुटच शिल्लक राहिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुर झाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाले आहेत. हा रस्ता छोटा करायचा की मोठा यावरून गुत्तेदारांनी अद्यापही कामात सुरुवात केली नाही.या रस्त्याच्या बाजूस अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर आहे. हा रस्ता शंभर फुटाचा केला तर शॉपिंग सेंटर पडण्याची भीती व्यापाऱ्यांना पडली आहे.त्यामुळे हा रस्ता शंभर फुटाच्या ऐवजी साठ फूट करावा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे.
काही व्यापाऱ्यांच्या हट्टापोटी लोकप्रतिनिधी व अधिकारी हा रस्ता शंभर फुटावरुन कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून कंधार शहरातील मेन रस्त्याचे कामे राजकीय श्रेयवादात अडकून पडल्यामुळे रस्ताचे काम होताना दिसत नाही. शहरातील मेन रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमणामुळे रस्त्यावर गर्दी होते असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झाले व अनेकांना जीव गमावा लागला आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग कंधारचा उपविभागीय अभियंता जोशी हे कंधार शहरातील मंजूर झालेल्या रस्ताचे काम अंदाजपत्रकानुसार करत नसून स्थानिक लोकांसोबत व राजकीय कार्यकर्त्यांसोबत संगणमत करून आपल्या मर्जीने रस्ते बनवत आहेत. त्याचे दुष्परिणाम कंधार शहरातील व तालुक्यातील जनतेला भोगावे लागत आहे .हा रस्ता कमी झाला तर भविष्यात पुन्हा नागरिकांना समस्या चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचे काम अतिक्रमण हटवून अंदाजपत्रकानुसार १०० फुटाचा करण्यात यावे अन्यथा माजी सैनिक संघटना रस्त्यावर उतरेल अशा इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.