जिल्हा परिषद शाळेच्या ४ विद्यार्थांची इस्त्रो सहलीसाठी निवड – शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची माहिती ; कंधार तालुक्यातील बारुळ बिटातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक

 

कंधार ; ( अंतेश्वर कागणे )

अंतरीक्ष केंद्र श्रीहरी कोटा आंध्रप्रदेश येथे शैक्षणिक सहल जिल्हा नांदेड येथिल शालेय विद्यार्थांची जिल्हास्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांची निवड यादी आज रोजी जाहीर झाली असून जिल्ह्या स्तरावरुन इस्ञोसाठीनिवड झालेल्या जि.प.हा.काटकळंबा व राऊतखेडा शाळेच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे .

 

विशेष चारही विद्यार्थी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांच्या बारुळ बीटातील आहेत .
अंतरीक्ष केंद्र श्रीहरी कोटा आंध्रप्रदेश येथे शैक्षणिक सहल मध्ये पात्र ठरलेली
आशित धनाजी चावरे
जि प हा काटकळंबा ,विश्वदिप दयांनद गर्जे प्रा.शा. राउतखेडा , जि प हा काटकळंबा कु .राजश्री प्रकाश बस्वदे ,
धनश्री विजय गोरकवाड ,
जि प हा काटकळंबा या यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी मधुकर मोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *