आज उपविभागीय कार्यालय कंधार येथे दिव्यांग विठ्ठल कतरे यांचा आत्मदहनाचा इशारा …! लोहा तहसीलदारांच्या निर्णया विरोधात आत्मदहन करणार …दिव्यांग विठ्ठल कतरे

कंधार ; प्रतिनिधी

कलबंर सहकारी कारखान्यात काम करत असतांना दोन्ही पाय गमावलेल्या पांगरा ( ता. कंधार ) येथील विठ्ठल कोंडीबा कतरे यांनी मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याने कतरे यांनी न्यायालयात दाद मागितली, न्यायालयाने विठ्ठल कतरे यांना भरपाई पोटी १लाख ६१हजार २८०रुपये व त्या रक्कमे वरील दि.१ नोहेंबर १९९९ पासुनचे व्याज देण्याचे आदेश दिले होते. परंतु, तहसीलदार यांच्या कडून कमी रक्कम आद करण्यात येत आहे.

 

न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे दि.२५ मार्च रोजी पर्यंत संपूर्ण रक्कम लोहा तहसीलदार यांनी अदा नाही केल्यास कंधारच्या उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर दि. २७ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा ईशारा कतरे यांनी निवेदणाद्वारे दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशा नंतर ही रक्कम मिळत नसल्याने विठ्ठल कतरे यांनी आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता त्यानंतर तहसीदार यांनी उपोषण मागे घेण्यास लावले व या मागणी संदर्भात दि.७ डिसेंबर २०२२ रोजी कंलबर सहकारी साखर कारखाण्याचे अवसायक यांच्या उपस्थितीत तहसिलदार यांनी सुनावणी घेतली. अवसायक यांनी लेखी पत्र देवून न्यायालयाच्या आदेशानुसार व्याजा सह २लाख ४६ हजार ७५५रुपये रक्कम कतरे यांना देण्यास आमची कांही ही हरकत नाही असे सांगितले असतांना ही लोहा तहसिलदार हे देय रक्कमेची विभागणी करून देत असल्याचे निवेदनात म्हंटले  आहे.

या संदर्भात कतरे यांनी लोहा तहसिल कार्यालयात जावून विचाराना केली असता १ लाख११ हजार २८० रुपये रक्कमेचा धनादेश कतरे यांना  अदा केला जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामुळे त्रस्त झालेल्या कतरे यांनी न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे व अवसायक यांच्या पत्रा नुसार माझी ठरलेली रक्कम २ लाख ४६ हजार ७५५ रुपये लवकरात लवकर मिळावी. नाही दिल्यास दि.२७मार्च रोजी कंधारच्या उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा ईशारा दि६ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देवून यास सर्वस्वी जबाबदारी लोहा तहसीलदार राहातील असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *