तर .. ! महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही – मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव …! लोहा येथे भारत राष्ट्र समिती ( BRS ) ची लक्ष्यवेधी सभा

 

लोहा प्रतिनिधी –

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक दलितांना १० लाख रुपये , शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व एकरी १० हजार रुपये अनुदान दिल्यास मी महाराष्ट्रात येणार नाही पण न दिल्यास मी महाराष्ट्रात प्रत्येक वेळी येईल असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लोहा येथे जाहीर सभेत केले.

लोहा येथे दि. २६ मार्च रोजी बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व नांदेड , छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदी दिग्गज नेते व कार्यकर्ते यांचा बीआरएस पक्षांमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव होते.

यावेळी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीआरएस पक्षांमध्ये लोहा मतदार संघाचे माजी शंकर अण्णा धोंडगे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन पाटील जाधव, बंजारा समाजातील जेष्ठ नेते माजी खासदार हरीभाऊ राठोड, नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड, नागनाथ घिसेवाड, प्रा. यशपाल भिंगे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय पाटील कराळे, जिल्हा परिषद सदस्य अॅड विजय धोंडगे, डॉ.सुनिल धोंडगे, मनोहर भोसीकर शेख अब्दुल सत्तार, धनंजय टकले, आदींने भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आहे .

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबद्दल काही बोलू लागले तुम्ही तेलंगणात बघा महाराष्ट्रात इकडे तुमचे काय काम आहे मी त्यांना सांगू इच्छितो मी भारताचा नागरिक आहे महाराष्ट्रातच काय मी भारतातील प्रत्येक राज्यात जातो मी तेलंगणा मध्ये प्रत्येक दलित कुटुंबीयांना उद्योग व्यवसायासाठी १० लाख रुपये अनुदान दिले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना १० हजार रुपये एकरी दिले आहेत, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पाणी देत आहोत, शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मोफत देत आहोत , शेतकऱ्यांचा कशाने मृत्यु झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना ५लाख रुपये देत आहोत, हे सगळे तुम्ही महाराष्ट्रात द्यावे शेतकऱ्यांच्या मालासाठी तेलंगणात ७ हजार केंद्र खोललेत ते तुम्ही महाराष्ट्रात खोलावे तेव्हा तुम्ही येथे खोलावे तेव्हा मी महाराष्ट्रात येणार नाही नाहीतर बार-बार वेळेस महाराष्ट्रात येईल.

पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या समोरून बंगालच्या उपसागरात पाणी जात आहे महाराष्ट्रत गोदावरी- कृष्णा नदी आहे पण येथे पिण्याचे पाणी मिळत नाही. आपल्याला अमेरिका, रशियाला पाणी मागायचे नाही येथे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी आहे ते साठवून जमिनीवर साठवून हरित क्रांती केली पाहिजे . येथे शेतकऱ्यांना वीज देता येत नाही बीआरएस सतेत येऊ द्या प्रत्येकांना वीज पाणी मिळेल . ३६१ बिलीयन टन कोळसा आहे त्यामुळे पुढील १२५ वर्ष देशाला वीज देता येईल.
येथे किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुनाम जटोलेजी आले आहेत त्यांनी १३ महिने शेतकऱ्यांची लढाई लढली ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा पंतप्रधान मोदी काही बोलले नाहीत उत्तरप्रदेशात निवडणूक आली की शेतकऱ्यांना गोड बोलून माफी मागितली .

शेतकरी, दलित, मजुर यांनी कुणालाही भीक मागायची नाही अब की बार किसान सरकार चा सर्वानी नारा दिला पाहिजे जो पर्यंत शेतकरी हे आमदार खासदार होणार नाहीत तो पर्यंत विकास होणार नाही असे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले.

तसेच यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे म्हणाले की मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे.
यावेळी सभेला हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *