काटकळंबा ता.कंधार येथील नारायणराव माधवराव पानपट्टे यांचे निधन!

कंधार तालुका प्रतिनिधी: दि.३०

काटकळंबा ता.कंधार जि.नांदेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक नारायणराव माधवराव पाटील पानपट्टे यांचे वृध्दपकाळाने आज दि.३० मार्च २०२३ गुरूवार रोजी दुपारी १२ वा.दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि.३१ मार्च २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ११ वा. काटकळंबा ता.कंधार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबुराव पानपट्टे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव पानपट्टे, इंदुबाई जाधव धानोरा , कमलबाई लोहकरे कांजाळा, सहशिक्षिका विमलताई पानपट्टे-गव्हाणे माकणी यांचे वडील होत तर एकनाथ पानपट्टे, हनमंतराव पानपट्टे,मिरा भाईंदर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ.संभाजीराव पानपट्टे, विस्तार अधिकारी पंचायत शिवाजीराव पानपट्टे यांचे काका आहेत. त्यांच्या पश्चात पाठीमागे मुले, सुना, जावाई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *