माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांची काँग्रेच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय भोसीकर यांनी केला सत्कार

 

लोहा ; अंतेश्वर कागणे

लोहा न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांची काँग्रेस कमिटीच्या लोहा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी सोनु संगेवार यांची सदिच्छा भेट घेऊन शाल पुष्पहार घालून सत्कार केला.

लोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे सक्रीय युवा कार्यकर्ते सोनु ऊर्फ व्यकटेश संगेवार यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस लोहा शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र नांदेड येथे त देण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, आमदार अमरनाथ राजुरकर,आमदार मोहन अण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार आदी उपस्थीत होते .
सोनु संगेवार हे चळवळीचे कार्यकर्ते असुन लोहा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असतांना त्यांनी शहरात अनेक योजना आनुन शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची पध्दत सर्व शहरातील नागरीकांना माहीत असुन ,गोरगरीबाच्या मदतीला धावुन जाणारे असल्यामुळे सोनु संगेवार शहरात प्रसिध्द आहेत त्यांच्या कामाची पध्दत पाहता त्यांच्यामुळे पक्षाला बळकटी येईल याचा विचार करुन पक्षाने त्यांला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे .त्याच्या
या निवडमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे .आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट देवुन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगर परिषदेचे माजी सभापती पंकजसिंह परिवार, सरपंच सतिश देवकत्ते, महेश वाडेवाले, भुषण दमकोंडवार, प्रविण महाबळे, मन्मथ मेळगावे, विनोद महाबळे,
आदींची उपस्थीती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *