श्री सुरेश राठोड नाव आठवलं की आठवतात त्या जुन्या काळातील आठवणी साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी माझी आणि सुरेश ची ओळख झाली ती एका वेगळ्या करणातून आणि चांगली मैत्रीही झाली त्या काळी आम्ही आणि काही मित्र मिळून खूप मस्ती करायची भांडणे मारामारी ही आमची दिवसभराची कामे मग नांदेड देगलूर मुखेड जळकोट या ठिकाणी जाऊन मित्रा समवेत राहणे कुरूला नेहरू नगर इत्यादी ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भांडणे मिटविणे हा आमचा नित्यकर्म कंधार शहरात चहाच्या टपरीवर रात्री बारा वाजेपर्यंत बसायचे मस्ती करायची आणि रात्री सुरेश ला तांड्या पर्यंत मी सोडून मगच घरी जायचो त्यामुळे माझ्यावर दोन तीन केसेसही झाल्या सुरेश मात्र संयमी मी मात्र थोडासा रागीट स्वभावाचा सुरेश नी नको मानले तरी मि एखाद्या ला मारायचो आमचे अनेक मित्र चांगली झाली जळकोट चा संतोष तिडके जि प सदस्य झाला आज अनेक मित्र चांगल्या पदावर आहेत त्यातलं एक नाव म्हणजे सुग्रीव गुट्टे तो ही आज आदर्श शिक्षक आहे मग कोणाचं लग्न असो किंवा कोणत्या मित्राचं कार्यक्रम असो सुरेश मात्र माझ्या लग्नावेळी करवला म्हणून आवर्जून उपस्थित होता त्याकाळी सर्वांचीच बिकट परिस्थिती होती सुरेश ची तर खूपच बिकट आणि तोही घरातला सर्वात मोठा पण सुरेश नि कुठलाच अनुभव नसताना आज घराला पुढे आणण्याचं काम केलंय रोजगार सेवकांची मोठी ताकत जिल्ह्यात उभी केलीय आज तो त्यांचा जिल्हा अध्यक्ष झालाय मेहनत करण्याची त्यांची तयारी असते भविष्यातही चांगलं यश मिळो अनेक आठवणी आहेत काही इथे व्यक्त करता येत नाहीत.
सुरेश भाई आपल्याला उदंड आयुष्य मिळो हीच सदिच्छा
तुझा मित्र
ऍड अंगद केंद्रे
प्रभारी तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार