नांदेड ; हॉटेल गणराज नमस्कार चौक नांदेड येथे आझाद ग्रुप आणि दैनिक युवाराज्य आयोजित जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वप्रथम माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.यावेळी उपस्थित साहित्य, कला,शिक्षण, आरोग्य, क्रीडा,व्यवसाय व इतर अनेक क्षेत्रातील प्रगतशील महिलांना शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीने सौ.आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सौ.आशाताई म्हणाल्या की,मासाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणात आणून महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहण्याची भूमिका घेण्याची काळाची गरज आहे.तसेच राजकीय क्षेत्रातील असो वा इतर कोणतेही क्षेत्र असो महिलांनी प्राधान्याने अग्रेसर राहून नामधारी राहण्याऐवजी कामदारी झाल्याशिवाय बदल घडून येणार नाही. असे याप्रसंगी सुचविले व 17 वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत प्रगतशील महिलांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या सविताताई संतोष मुरकुटे, सौ.सुमनबाई आनंदराव शिंदे, मा. जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडितराव पवळे सर, आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर सर, सतीश पाटील बाबर, संगीताताई विजय धोंडगे, मनीषाताई धोंडगे सह पुरस्कार प्राप्त मीनलताई मोटेगावकर, चित्राताई गोळेगावकर, प्रतिभाताई मोरे,जयश्रीताई मोगमवार सह सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर महिला मंडळी तसेच एकलव्य हॉस्टेलच्या संचालिका रुचिकाताई गणेश शिंदे, आझाद ग्रुपचे अध्यक्ष प्रभाकर पांडे, कार्यक्रमाचे आयोजक गणेश शिंदे,धाराशिव शिरोळे, विनोद गवते, प्रा. दीपक रायफळे, राजमुद्रा न्यू संपादक संगमेश्वर लांडगे, प्रसाद पोले, मुरलीधर हंबर्डे, संतोष मुरकुटे,उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे पवार सर सह महिला व मान्यवर मंडळी उपस्थित होते.