कंधार : (धोंडीबा मुंडे )
कंधार तालुक्यातील आंबुलगा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ब्रह्मवाडी येथील रोहित जळाल्यामुळे हे गाव दोन महिन्यापासून अंधारात असल्याने लाईट ऑफिस कंधार येथे ग्रामपंचायत कार्यालय आंबुलगा च्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आले. लाईटवर अवलंबून असणारे आमचे छोटे मोठे उद्योग धंदे बंद असून त्यांचे नुकसान भरपाई आम्हाला कोण करणार ? महावितरणच्या निष्काळजी मुळे नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही. तसेच दळण बंद , मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे फोन सुविधा बंद त्यामुळे लोकांना एकमेकांशी संवाद साधता येत नाही.
रात्रीच्या वेळी अंधारात उजेड नाही.लाईट बंद असल्याने मोठ्या प्रमाणात डासाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ब्रह्मवाडी येथील नागरिक संसर्गजन्य आजार वाढण्याची भीती व्यक्त करीत आहेत. ब्रम्हवाडी येथील नागरिकांचा असा सवाल केला आहे. कि वीज वितरणाचे रेगुलर बिल भरणारे ग्राहक सवाल करीत आहेत.अगोदर डासाचे प्रमाण उन्हाळ्यात पाण्याची टंचाई समस्या असून बिल भरणाऱ्या ग्राहकाला तरी वेळेवर वीज पुरवठा करावी अशी मागणी ग्राहक करीत आहेत.