पतंजली योग समितीच्या योगसाधकांचा नांदेड येथे स्नेहमिलन कार्यक्रम

 

नांदेड ; ( दिगांबर वाघमारे )

 

पतंजली योग समिती कंधारच्या वतीने कोरोना महामारीत दिनांक 3 एप्रिल 2021 पासून योगशिक्षक नीळकंठ मोरे यांच्या अथक परिश्रमातून सातत्याने चालणाऱ्या गुगल मीट लाईव्ह योग वर्गाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने,सर्व योगसाधक माता-भगिनी व बंधू यांचे स्नेहमिलन कार्यक्रम वासवी माता मंगल कार्यालय कॅन्सर हॉस्पिटल जवळ सिडको नांदेड येथे दि . 3 व 4 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमास संपुर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 150 योगसाधक उपस्थित राहणार आहेत.

 

या योगशिबीरास योगशिक्षक नीळकंठ मोरे ,पतंजली योग समिती तालुका प्रभारी कंधार,योगशिक्षक विलास बिरादार,योगशिक्षिका सौ.मंजू नवलकुमार संचेती मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाला खासदार. प्रतापरावजी पाटील चिखलीकर , मा. डॉ.अभिजीत राऊत ( जिल्हाधिकारी नांदेड ), मा.सौ. वर्षाताई ठाकूर ( कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड ) प्रणिताताई देवरे ( मा . जि.प. सदस्य नांदेड ) ,मा. प्रशांत दिग्रसकर ( मा. शिक्षणाधिकारी जि.प.नांदेड ), मा.डॉ.अजय कदम ( मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड ),मा. संजय येरमे ( शिक्षण विस्तार अधिकारी नांदेड जि.प.नांदेड ),मा.प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे ,शहाजी नळगे नगरसेवक कंधार आणि पतंजली योग समिती नांदेडचे सर्व समितीचे जिल्हा प्रभारी व वरिष्ठ पदाधिकारी या सर्वांची उपस्थिती लाभणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *