श्री बालवीर हनुमान मंदीर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि. 04 ते 6 एप्रिल रोजी किर्तन महोत्सव तर 7 एप्रिल रोजी महाप्रसाद

मुखेड ; शहरातील श्री बालवीर हनुमान मंदीर झेंडा चौक येथे श्री हनुमान जन्मोत्सव व प्रथम वर्धापन दिनानिमित्त दि. 04 एप्रिल 2023 पासुन ते 6 एप्रिल 2023 पर्यत किर्तन महोत्सव तर दि. 07 एप्रिल 2023 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असुन भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालवीर हनुमान मंदीर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 

श्री बालवीर हनुमान मंदीराचे जीर्णोध्दार होऊन हनुमान जन्मोत्सव रोजी एक वर्ष झाले असुन या निमित्ताने दि. 04 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजता ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे किर्तन आहे. दि. 05 एप्रिल 2023 रोजी ह.भ.प. स्मिताताई आजेगावकर यांचे रात्री 8 ते 10 रोजी किर्तन तर दि. 06 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजता ह.भ.प. भालचंद्र महाराज सरदेशपांडे यांचे किर्तन आयोजित केले आहे. तसेच दि. 07 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान श्रीकांत हिरेमठ यांच्या वतीने महाप्रसाद करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरातील भाविकांनी उपस्थित राहुन किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालवीर हनुमान मंदीर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट…

बाळरुपी हनुमानाची मुर्ती पंचक्रोषीत शहरातील झेंडा चौक येथील श्री बालवीर हनुमान मंदीरात विराजमान आहे. यामुळे या मंदीराचे नाव श्री बालवीर हनुमान मंदीर आहे. साधारण: ही मुर्ती 250 ते 300 वर्षापुर्वीची असुन भक्तांवर नेहमी कृपादृष्टी श्री बालवीर हनुमानाची असल्याचे येथील भक्त सांगतात. या मंदिरात राजस्थान येथील ढोलपुरी दगडी काम असल्याने पाहण्यासाठी सुद्धा भक्त दूरवरून येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *