कंधार ; कांही दिवसा पूर्वीच लोहा येथे भारत राष्ट्र समिती पक्षाची नियोजन बद व अभूतपूर्व गर्दीची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. या सभेचा रेकॉर्ड तिन्ही पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेला मोडता आला नाही. असे म्हणत बीआरएसचे नेते माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर टीका केली.
महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे रविवार दि.2 एप्रिल रोजी ‘वज्रमूठ’ सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना (ठाकरे गट) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. तिन्ही पक्षाच्या वतीने मराठवाड्यात अनेक बैठका घेवून कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही या सभेला लोहा येथे झालेल्या बीआरएसचे नेते तेलंगानाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या तुलनेत गर्दी नव्हती. तिन्ही पक्षांना मिळुनही एका पक्षाच्या सभेचा रेकॉर्ड मोडता आला नाही.
शिवाय या सभेत तिन्ही पक्षांच्या नेत्यांन कडून राज्यातील विकासात्मक व लोक हितांच्या प्रश्ननांची सोडवणूक करण्या बाबतीत बोलण्या पेक्षा एक मेकांची उणी धुनी काढण्यावरच भर देण्यात आला. राज्यातील सत्ता धारी व विरोधी पक्षांचा सद्या टीका टिपणी करणे हा एकच अजेंडा सुरु आहे. राज्यातील जनतेचे या लोकांना काहीही देणे घेणे नाही. असे ही शंकरअण्णा म्हणाले.
*अनेकांचा बीआरएस प्रवेश*
भारत राष्ट्र समिती पक्षाचे तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या लोक उपयोगी कामा प्रति भराहून गेलेले महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी राज्यध्यक्ष कदीर मौलाना, सोलापूरचे माजी खा.धर्मा अण्णा शार्दूल, वैजापूरचे आजी आ. कैलास पाटील यांचे सुपुत्र भाजपा नेते अभय चिकटगावकर, जालना येथील शेतकरी संघटनेचे बबनराव गवाले, करमाडा (छत्रपती संभाजीनगर ) येथील पुंडलिक उकिरडे, अहमदपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष वसंतराव शेटकर, शेकाप नांदेडचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंदराव डुमने यांनी नुकताच बीआरएस मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती शंकर अण्णा यांनी दिली. नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या माजी आ. धोंडगे यांनी पक्ष वाढी साठी कंबर कसली असुन उद्या पासुन ते विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.
______