कंधार ; प्रतिनिधी
महादेव मंदिर पांगरा ता.कंधार येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे उपस्थित राहून सर्वप्रथम दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित ह ब प काब्दे महाराज,नागेंद्र महाराज पानभोसिकर यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी सौ.आशाताईंनी कीर्तनाचा कीर्तनाचा आनंद घेत उपस्थित गावकऱ्यांना सप्ताह समाप्तीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने सौ.आशाताई यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश पाटील कराळे,सरपंच सखाराम सूर्यवंशी, उपसरपंच गोविंदसिंग ठाकूर,चंद्रकांत घोरबांड,विठ्ठलराव पाटील,रमेश सिंग ठाकूर,पत्रकार विठ्ठल कतरे,प्रेमसिंग ठाकूर, लखन ठाकूर, विठ्ठल टेकाळे, शिवाजी कोटेवाड,संभाजी टेकाळे सह भजनी मंडळी,कार्यकर्ते गावकरी,महिला उपस्थित होते.
_________________
Advt .