मथुरा शहरापासून ५६ किलोमीटर दूर बरसाना शहरात राधेची आई किर्ती यांच अप्रतिम, सुंदर अस मंदिर जगद्गुरू कृपालू परिषदेच्या २५ एकर जागेपैकी आडीच एकर जागेवर नार्वे या देशातून डायमंड मार्बल आनून बांधले आहे.
किर्ती माँ मंदिराच ऊदघाटण फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आले आहे. किर्ती मातेचे जगातले हे पहिले मंदिर आहे. (आता पर्यंत राधेच्या मातेचे मंदिर कुठेही नव्हते.) या मंदिरात दररोज दहा हजार भक्त भेट देतात. मंदिरात वेगवेगळ्या महोत्सव काळात म्हणजे गुरू पौर्णिमा, जन्माष्टमी, रंगपंचमी या काळात एकाच दिवसात ७० – ७५ हजार भक्त येत असतात. अशी माहिती या मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव श्री नितीन जी यांनी आम्हाला दिली.
या मंदिर परिसरात कृपालू महाराज यांच्या विरंगुळ्यासाठी एक छोटेखानी गार्डन तयार करण्यात आले आहे. या गार्डन मध्ये कृपालू महाराज यांच्याशिवाय ( गार्डनची देखभाल करणारे कर्मचारी वगळता) अन्य कुणालाही आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. कृपालू महाराज गेल्यानंतर गार्डनच्या गेटला कुलूप लावून असते. या गार्डन मध्ये जीवंत मोर आहेत. व्यवस्थापन समितीचे सचिव श्री नितीन यांच्या सोबत आम्ही गेलो होतो. म्हणून इथे आम्हाला गार्डन मध्ये प्रवेश मिळाला. तसेच ही छायाचित्र काढता आली. खूप खूप एन्जॉय करता आला. ईतक जवळून दर्शन आणि माहिती मिळाली. ती कृपालू महाराज यांचे परमभक्त आणि आमचे मित्र खंडेराव साखरे यांचेमूळ… धन्यवाद साखरे जी… धन्यवाद!
( आनंद कल्याणकर यांच्या एफबी वरून )
_____________
खुष खबर … प्रवेश देणे चालू आहे .