राष्ट्रभक्तांचा अपमान करणे ही भाजपाची संस्कृती नाही -आ.डॉ. तुषार राठोड

 

मुखेड -स्वातंत्र्यवीर सावरकर हे जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची उमेदीची सर्व वर्ष देशसेवेसाठी खर्ची केली. त्यांना त्यासाठी अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. त्यांच्यासमोर अंदमानमध्ये असताना दर दोन दिवसाला एका माणसाला फाशी दिली जायची कारण त्यांचे त्यामुळे मनोबळ खचावे हा इंग्रज सरकारचा उद्देश होता पण यामुळे सावरकर खचले नाहीत.स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचा अमृतमहोत्सव आपण साजरा केला अशा अवस्थेत काँग्रेसचे नेते वेळोवेळी सावरकरांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रभक्तांचा अपमान करणे ही काँग्रेसची संस्कृती असू शकते पण राष्ट्रभक्तांचा सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे. हे जनतेला व आपल्याला कळलं पाहिजे यासाठी ही सावरकर गौरव यात्रा आयोजित केली आहे. आपली दिशाभूल करने, आपल्यात फूट पाडून त्यांनी मागील ७० वर्षे सत्ता भोगली आहे .जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू वरती अन्याय होत राहिला.आतंकवाद बोकाळला परंतु तो काँग्रेसने थोपवला नाही.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व अमित शहा साहेब यांनी काश्मीरमधील ३७० कलम व ४५A कलम रद्द करून खऱ्या अर्थाने भारतीयांना न्याय दिला आहे.देशात व राज्यात आपले सरकार हे देशभक्तीचा व गरीब कल्याणाचा मंत्र घेऊन काम करत आहेत. स्वातंत्र्यवीरांचे विचार आपण सर्वांनी गावोगाव व घरोघर पोहोचवावेत असी आपणास विनंती करतो.राष्ट्रभक्तांचा अपमान करणे ही भाजपाचे संस्कृती नाही असे प्रतिपादन मुखेड -कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुखेड येथे सावरकर गौरव यात्रेनिमित्त भारतीय जनता पार्टी व समविचारी संघटनांनी आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना केले.
या वेळी डॉ.रामकृष्ण बदने यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की वयाच्या पंधराव्या वर्षी चाफेकर बंधूंना झालेल्या फाशीने बेचैन होऊन सावरकरांनी इंग्रज सरकार विरोधात देश स्वातंत्र्याची शपथ घेतली. सावरकर हे नाव उच्चारताच आपल्या शरीरात शौर्य, देशनिष्ठा प्रज्वलित होते. आपले व आपल्या परिवाराचे सर्वस्व त्यांनी देशासाठी अर्पण केले. वडील अत्यंत धार्मिक व शिस्तप्रिय होते. ग्रंथावर प्रेम करणारे होते. तो संस्कार सावरकरांवर ही झाला. इंग्लंडमध्ये १९०६ -१९१० या काळात शिक्षण घेताना त्यांनी इंग्लडमधुन भारतात क्रांतीकारकांसाठी शस्त्रे पाठविली. अंदमानच्या तुरुंगात त्यांना तेलाच्या घाण्याला जुंपण्यात आले.असे कितीतरी छळ सहन करून भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या स्वातंत्र्यवीराने खूप मोठे योगदान दिले.भाषा शुद्धी साठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.साहित्यिक म्हणूनही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.भाषेत विविध नवीन शब्द मराठीत देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
यावेळी दुसरे प्रमुख वक्ते डॉ.माधव पाटील उच्चेकर म्हणाले की काँग्रेसवाले हे सूर्यावर थुंकण्याचे सामर्थ्य सावरकरांबद्दल बोलून करत आहेत. पण काही फरक पडत नाही. नरेंद्र मोदी साहेब हे सावरकरांच्या विचारावर काम करतायेत. हे काहीजणांना म्हणजेच काँग्रेसला नको आहे.सावरकर म्हणजे तेज,त्याग, तत्व, तर्क, तारुण्य,तीर, तलवार होय असे मत अटल बिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना स्वातंत्र्यासाठी एकुलता एक मुलगा गमावावा लागला. त्यांच्यावर राहुल गांधी शिंतोडे उडवत आहेत हे निंदणीय आहे.राहुल गांधींना वाटते की या देशाचा वारसदार मी व माझा परिवार आहे.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांनाच मताचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आता असा विचार करणे त्यांनी सोडला पाहिजे.सावरकरांना अंदमानच्या जेलमध्ये आणत असतानाचा प्रसंगही त्यांनी सविस्तरपणे विशद केला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणापासूनच राष्ट्र प्रेमाने भारलेले होते. त्यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली व ती साकार करण्यासाठी प्रयत्न केला.सावरकर हे आपल्यासाठी जाज्वल देशभक्तीचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे चरित्राचे आचरण आपण केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यंकटराव जाधव गुरुजी यांनी केले. तसेच संतोष जांबकर यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रथमता वीरभद्र मंदिर मुखेड येथून मी सावरकर प्रेमी या टोप्या घालून व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी फलक हातात घेऊन सावरकरांच्या तैलचित्र ठेवून त्यांची पूजा करून सोबत रथावरुन घेत ही गौरव यात्रा मुखेडच्या मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आली येथे छत्रपतींच्या व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तदनंतर सभेला प्रारंभ झाला. या गौरव यात्रेत भारतीय जनता पार्टी,बाळासाहेबांचे शिवसेना ( शिंदे गट ),बजरंग दल,विश्व हिंदू परिषद यांचे नेते व कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने समाविष्ट झाले होते.
या गौरव यात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे, माधव अण्णा साठे, अॅड धनंजय येवतीकर, जगदीश बियाणी, चंद्रकांत गरुडकर, सत्यवान अण्णा गरुडकर,माधव मुसळे, लक्ष्मण पाटील खैरकेकर, राजू घोडके, अशोक गजलवाड, किशोर सिंह चौहाण ,दीपक मुक्कावार,महेश मुक्कावार,व्यंकटराव लोहबंदे, गणेशराव जाधव, महावीर शिवपूजे, संग्रामप्पा मळगे,हेमंत खंकरे,विनोद दंडलवाड, सुधीर चव्हाण उपस्थित होते.

__________________

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *