लोहा – लोहा पंचायत समितीचे लोकप्रिय आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठलराव कुलकर्णी याच्या सेवापुरती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना गटविकास अधिकारी शैलेश वावळे यानी बोलताना म्हणाले कुलकर्णी साहेबानी जनसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद उराशी बाळगून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा तात्काल पुरवण्याचे काम करून निष्कलंक सेवा मनोभावे केली
तसेच चेहर्यावर नेहमीच स्मित हास्य ठेवून सर्वाना
आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. कुठल्याही संकटातून मार्ग काढून सहकार्य करायचे दोन मिनिटातच समोरच्याला आपलस करण्याची कला कुलकर्णी साहेबात आहे.म्हणून सर्वाच्याच तोडी त्याच नाव होत.
या लढवया विठ्ठलराव वसंतराव कुलकर्णी याचा जन्म
बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा नादेड जिल्ह्य़ाचे शेवटचे टोक असलेल्या कुरूला गावी 15/03/1965 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण जि.प.शा.कुरूला माध्यमिक शिक्षण शिवाजी विध्यालय
दिग्रस बु.महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय कंधार. येथे घेऊन जि.प.च्या प्रशासकीय सेवेत दि.01/04/1985 रोजी आरोग्य पर्यवेक्षक म्हणून लिबगाव पि.ए.सी.तुन सुरवात केली.
2 वर्षे नंतर जन्म भुमी आसलेल्या कुरूला येथे 19 वर्षे कंधार येथे 5 वर्षे लोहा पंचायत समितीमध्ये10 वर्षे सेवा करून आज वयोमानानुसार 31 मार्च ला सेवानिवृत्त झाले आहेत.कोविड कालावधीत जिव मुठीत घेऊन साहेबांनी लोहा तालुक्यात तातडीने रूग्णाना सोई सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तत्कालीन जिल्ह्य़ाधिकारी विटनकर सरानी कामाची दखल घेऊन कुलकर्णी साहेबांचा सत्कार करण्यात आला.
याचा सेवापुरती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.उपसभापती नरेंद्र गायकवाड, मा.उपसभापती रोहीत पाटील आडगेकर,तालुका आरोग्य अधिकारी गुजलवार पत्रकार ओमकार लोहेकर,श्रीराम फाजगे ,बापू गायकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गजानन शिदे कक्ष अधिकारी चोरमले ,सहायक प्रशासन अधिकारी वाघमारे ,लेखा अधिकारी गुंडावार ,पंचायत विस्तार अधिकारी गायकवाड ,देशपांडे, मेहेत्रे आणी कृषी विस्तार अधिकारी चोंडे व सोनाली सुतार मॅडम रोहयो लिपिक भिंगोले, तेलंग तसेच सर्व कुलकर्णी फॅमिली अनंत कुलकर्णी संध्या कुलकर्णी मोठे बंधू विनायक कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती सर्व कुटुंब उपस्थित होते.
वसर्व पंचायत समितीचे स्टॉप उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी शैलेश वावळे याच्या मार्गदर्शनाखाली झाले.