पिस्तुलने शुभमच्या बरगडीत गोळी मारून गंभीर दुखापत करून खुन करण्याचा प्रयत्न

 

( नांदेड जिल्हा क्राईम – जनसंपर्क अधिकारी ,पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांची प्रेस नोट दि ५ एप्रिल २०२३ )

 

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्रं. 137 / 2023 दिनांक : 05.04.2023

1) खुनाचा प्रयत्न :-

नांदेड ग्रामीण :- दिनांक 03.04.2023 रोजी 19.30 वा. चे सुमारास ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज पासुन पांगरी रोडवर, विष्णुपूरी ता. जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी ही तिचा मित्र शुभम याचे सोबत पांगरी रोडने मोटार सायकल वर जात असतांना एक अनोळखी इसम वय अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटातील याने फिर्यादीच्या मोटार सायकल समोर येवून त्यांना थांबविले व तुम्ही दोघे माझ्या सोबत बाजुला चला असे म्हणाला फिर्यादी व तिच्या मित्राने त्याला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीच्या गालावर थापड मारली व त्याचे कमरेला लावलेली पिस्तुल काढुन त्याचा धाक दाखवुन फिर्यादीच्या मित्र शुभम याचे गळयातील चांदीची चैन पाच तोळयाची किंमती 3000/- रूपयाची जबरीने काढुन घेतली व शुभमचे पॅन्टचे खिशातील पैसे काढत असतांना शुभमने विरोध केला असता त्या अनोळखी आरोपीने त्याचे हातातील पिस्तुलने शुभमच्या बरगडीत गोळी मारून गंभीर दुखापत करून खुन करण्याचा प्रयत्न केला व शुभमच्या खिशातील नगदी 2000/- रूपये जबरीने काढुन घेवून पळुन गेला. वगैरे फिर्यादी स्नेहा प्रकाश रणखांबे, वय 15 वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. आंबानगर, सांगवी ता. जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 233 / 2023 कलम 307,394,397 भादवी सह कलम 3 / 25,3/27 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री आनंद बिच्चेवार, मो.क्रं. 9561038001 हे करीत आहेत.

 

2) घरफोडी : :-

भोकर :- दिनांक 04.04.2023 रोजी 01.00 वा. चे सुमारास शहीदनगर, भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले नगदी व तसेच बाजूला लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे नेकलेस, कानातील झुमके असा एकुण किंमती 1,10,000 /- रूपयेज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. वगैरे फिर्यादी मुन्नीरोदिन शबिरूदिन इनामदार वय 30 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. साईनगर, भोकर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे भोकर गुरन 111 / 2023 कलम 457,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री पाटील, मो.क्रं. 9850550670 हे करीत आहेत.

3) विवाहीतेचा छळ :-

1) नांदेड ग्रामीण :- दिनांक 02.04.2018 ते दिनांक 10.10.2021 रोजी पावेतो, फिर्यादीचे सासरी घरी हनुमान मंदीरजवळ इतवारा बाजार, नांदेड ह.मु. नरहरी मंदीराजवळ सिडको, नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीस झेरॉक्स व टाईपींग मशीन घेवून व्यवसाय सुरू करण्यासाठी तुझ्या माहेरहून दोन लाख रूपये घेवुन ये म्हणुन लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक तसेच माणसीक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 30 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 234 / 2023 कलम 498 (अ),323,504,506 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / श्री शिंदे, मो.क्रं. 9511851737 हे करीत आहेत.

2) मनाठा :- लग्न झाले पासुन सहा महिने पासून ते दिनांक 03.04.2023 रोजी चे 01.00 चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी लोहा ता. लोहा जि. नांदेकड ह.मु. चिंचगव्हाण ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस चारित्र्यावर संशय घेवून माहेरहून अॅटो घेण्यासाठी एक लाख रूपये घेवुन ये म्हणुन मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक तसेच माणसीक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 29 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मनाठा गुरनं 34 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / श्री पवार, मो.क्रं. 9822921694 हे करीत आहेत.

3) कंधार :- सन 2022 ते आज पावेतो, फिर्यादीचे सासरी मुंडेवाडी ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील नमुद

सात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे घेवुन ये म्हणुन मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक तसेच माणसीक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 22 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरनं 91 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 548 काळे, मो.क्रं. 9049585677 हे करीत आहेत.

4) अपघात :-

लोहा :- दिनांक 25.03.2023 रोजी 16.30 वा. चे सुमारास, आंबेसांगवी पाटील जवळील चिखलभोसी ते धावरी जाणाऱ्या रोडवर ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी यांनी आपल्या ताब्यातील मोटार सायकल रोडच्या बाजुला उभी करून लघुशंका करण्यासाठी गेला असता त्याचे सोबत असलेला भाचीचा मुलगा मयत नामे दत्ता उर्फ दत्तात्रय मारोती शिरगिरे, वय 17 वर्षे, रा. गुंडेवाडी ता. लोहा जि. नांदेड हा मोटार सायकलला टेका देवून उभा असताना यातील टेम्पो चालक आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन टेम्पो क्रमांक एमएच-26 / बीएम-5540 ही हयगय व निष्काळजीपणाणे भरधाव वेगात चालवुन यातील मयत यास जोराची धडक देवून त्याचे मरणास कारणीभूत झाला. वगैरे फिर्यादी सुरेश गोविंदराव कोनापुरे, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा. उमरदरी ता. मुखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरनं 76 / 2023 कलम 279, 338,304 (अ), भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री सोनकांबळे, मो.क्र. 9823867336 हे करीत आहेत.

5) भारतीय हत्यार कायदा :-

1) नांदेड ग्रामीण :- दिनांक 03.04.2023 रोजी 20.45 वा. चे सुमारास, म्हाडा वसाहतीचे चौकात शिवाजी हायस्कुल शाळेच्या कंपाउन्ड भिंतीलगत, नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकादेशीररीत्या आपले ताब्यात एक खजर बाळगेला मिळुन आला वगैरे फिर्यादी पोकों / 1591 शेख मुबीन शेख मदार, ने. पोस्टे नांदेड ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 232 / 2023 कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / श्री भारती, मो.क्रं. 9096270187 हे करीत आहेत.

2) वजिराबाद :- दिनांक 04.04.2023 रोजी 17.30 वा. चे सुमारास, गोवर्धन घाट शमशान भूमीच्या पायऱ्याजवळ, नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकादेशीररीत्या एक लोखंडी गावठी पिस्टल किंमती 20,000/- रूपयाची आपले ताब्यात बाळगेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोकॉ / 152 मनोज बापुसिंह परदेशी, ने. पोस्टे वजिराबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरनं 100 / 2023 कलम 3 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री जमदाडे, मो.क्र. 9890396652 हे करीत आहेत.

 

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *