फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
फुलवळ ता.कंधार येथे ता. ४ एप्रिल रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या उमेद महिला ग्रामसंघ फुलवळ ची संवाद बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी बैठकीस उपस्थित मा .रामदास धुमाळे सर (राज्य अभियान व्यवस्थापक उमेद )
मा.गजानन पातेवार सर (जिल्हा अभियान व्यवस्थापक नांदेड )
मा.द्वारकादास राठोड सर (जिल्हा व्यवस्थापक नांदेड SIIB&CB)
मा शिवशंकर चिलगर (तालुका अभियान व्यवस्थापक पं.स.कंधार)
मा.रमजान पठाण (प्रभाग समन्वयक तथा तालुका व्यवस्थापक पं.स.कंधार)
मा.नितीन पाटील (प्रभाग समन्वयक )
व गावातील पत्रकार ,गावातील सी.आर.पी.जयमाला डांगे व ग्रामसंघ लिपिक दीपिका मंगनाळे उपस्थित सर्व ग्रामसंघ पदाधिकारी व समूहातील महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा.धुमाळे सर यांनी महिलांना व्यवसायाबद्दल माहिती दिली गावाची एकूण कुटुंब संख्या ८९५ असून ४६१ महिला ह्या उमेद अभियानात समाविष्ट झाले व उर्वरित महिलांना अभियानात येण्यासाठी मार्गदर्शन केले .
गावात एकूण ४० समूह असून २० समूहाला बँक कर्जाचा प्रथम डोस ३०.१५ ,द्वितीय डोस १० समूहाला ४३.९९
व ग्रामसंघाला समुदाय गुंतवणूक निधी (CIF) ३ लाख . देण्यात आले त्यानिधीतून व्यवसाय करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले
गावातील बेरोजगार 18 वर्षावरील मुला,मुलींना Rseti व DDUGKY मार्फत होणाऱ्या मोफत प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजयमाला डांगे यांनी व्यक्त केले.
________