कंधार : प्रतिनिधी
तालुक्यातील गुंटूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सहाव्यांदा चेरमन पदी भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या गुंटूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये गुंटूर, गुंटूर तांडा व वाडी मिळून असणारी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झाली आहे. सहाव्यांदा चेरमन पदी भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेरमन पदी व्यंकटी वारकड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यामध्ये खंदाडे व्यंकटी, मुंडकर सर्जेराव, चिलपिपरे किशन, येमलवाड मारोती, चिलपिपरे अशोक, चमरगौर दतुसिंग, भांगे भारतबई, आगलावे कौशल्याबाई, राठोड लक्ष्मण, सुर्यवंशी बापुराव, जाधव दत्तात्रय या सोसायटी मधील १३ पैकी १३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक डी ए मदने, चिलपिपरे मोहन, विठ्ठल शिंदे, धोंडीबा गुंटूरे, चिलपिपरे भुजंग यासह गावातील नागरिक उपस्थित होते. सहाव्यांदा चेअरमन पदी भगवान शिंदे यांची निवड झाल्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सत्कार करून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.