आरक्षणाच्या रक्षणासाठी आरक्षण हक्क समिती आक्रमक : म. फुले जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) कंत्राटीकरण, खाजगीकरण याचा दि. १४ मार्च २०२३ चा शासन निर्णय रद्द करा, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण बहाल करा, जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध २० मागण्यांसाठी आरक्षण हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. संवैधानिक हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरूद्ध एल्गार पुकारण्यात आला.
राज्यात आणि देशात पुन्हा एकदा विषमतावादी वारे वाहू लागले आहेत. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अनेक महत्त्वपूर्ण तरतुरी केल्या.

 

 

मागासवर्गीय जनतेला समानतेच्या तत्त्वावर आणण्यासाठी शासकीय आणि शासनाच्या अनुदानावर चालणान्या संस्थांमध्ये नोकरीत आरक्षण ठेवण्यात आले. या आरक्षणामुळे शोषित, पिडीत, वंचित, आदिवासी, भटके, दलित, मागासवर्गीय यांचा कायापालट होऊ लागला आहे. शोषितांची ही प्रगती पाहवत नसल्याने केंद्र सरकारकडून सरकारी संस्था आणि अनेक महत्त्वाच्या बाबींचे खाजगीकरण सुरू आहे. हे खाजगीकरण संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे आरक्षण अवाधित राहावे, मागासवर्गीय कर्मचान्यांना संविधानाच्या तरतुदीप्रमाणे पदोन्नती मिळावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, देशातील कामगार हिताचे ४४ कायदे रद्द करून चार नविन कायद्यानुसार कामगार व कामगार संघटनांविरोधी केलेले बदल रद्द करण्यासाठी आणि समाजाच्या हिताच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी आज दि. ११ एप्रिल रोजी आरक्षण हक्क समितीच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. यात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण हक्क कृती समिती स्थापन करून हे आंदोलन छेडण्यात आले.
परदेशी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीची रक्कम अदा करतांना डॉलर रेटप्रमाणे ती देण्यात यावी, नवीन शैक्षणिक धोरणात खाजगी विद्यापीठांत एस.टी., एस.सी., व्हीजेएनटी, ओबीसी यांना शिष्यवृत्ती व फ्री • शिफ्ट योजना लागू करावी, सरकारने सवलती दिलेल्या सगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये कामगारांना हक्क देण्यात यावेत अशा विविध २० मागण्या घेऊन राज्य आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात समितीचे राज्य निमंत्रक संजीवन गायकवाड, अध्यक्ष जीवन कांबळे यांच्यासह अभिजीत बळेगावकर, यशवंत कांबळे, एस.एम. पोपुलवार, व्यंकटी कोंडावार, आर. एस. गजभारे, बी.पी. कापसे, विजय वाघमारे, रमेश भालेराव, रोहिदास कांबळे, यशवंत कांबळे, पी.पी. वाघमारे, व्ही.सी. वाघमारे, एस.एस. डाकणवाले, एन.जे. गायकवाड, बी.एस. शिरसीकर, आर. एस. टोके, आर. पी. खिल्लारे, राजेश जोंधळे, साहेबराव पवार, सचिन गुंडाळे, एस. व्ही. हनुमंते, केसराळीकर, जी. एन. सहदेव, संजय राजे, ए.एस. पडघणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *