नांदेड ( प्रतिनिधी ) महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदुत, थोर समाज सुधारक, आणि स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत कलवले सर यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था चे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमोलभाऊ केंद्रे साहेब , समतादूत विनोद पाचंगे आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषानी सामाजाच्या ऊत्थानासाठी,उद्धारासाठी, परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी अव्याहतपणे काम केले असून त्यांचे मोठे योगदान आहे. स्त्रियांची पहिल्यांदाच शाळा काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून मोलाचे कार्य केले. शैक्षणिक व सामाजिक कार्यात वाहून घेतल्याचे मत बार्टी प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी व्यक्त केले.इथला समाज समृद्ध करण्यात महापुरुषांनी मोठे योगदान दिले असून त्यांचे विचार समाजास प्रेरक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री कलवले सर यांनी अशा शब्दांत आपले विचार व्यक्त केले. समतादूत विनोद पाचंगे साहेब यांनी बार्टीच्या विविध उपक्रम राबविण्यात माहिती दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री एस.एस सुंदाळे, एम.एन.गुंटूरकर, ए.व्ही.रामगिरवार एच.आर.चव्हाण,आशीर्वाद गाढे, एन.पी. केंद्रे ,आर.के.जाधव, रामदास ऊदगीरवाड, चंद्रमणी सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतूजा बाचेवार यांनी केले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, तसेच या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन सहकार्य केल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यीनी कु. श्रुतिका मगर यांनी आभार प्रदर्शन केले .