हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत..!
त्याच शेजारी मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना फ्लोरा फौंटनवर रस्त्याच्या एका कडेला भलीमोठी पुस्तकांची रांग लावलेली दिसली की समजायचं आपण पोहोचलो आहोत पुस्तकांच्या दुनियेत पुस्तकांची दुनिया म्हणण्याचं कारण हे की, कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा ते पुस्तक येथील माणूस तुमच्यापुढे आणून सादर करणार आणि नसेल तर १-२ दिवसांत तुम्हाला शोधून पण देणार फोर्ट भागात फ्लोरा फौंटनवर लाखो पुस्तकांच्या माहेरघर येथे. या भेटी प्रसंगी माझ्या मनाला मनस्वी आनंद झाला. जर तुम्ही सुध्दा कधी मुंबईला फिरायला गेलात तर नक्की भेट द्या, पोटाला भूक लागली तर लोक ती भूक भागवण्यासाठी हॉटेल शोधतात आणि जर मनाला विचारांची भूक भागवायची असेल तर पुस्तकाच्या सानिध्यात जावेच लागते..!
– सोनू दरेगावकर, नांदेड..!