नांदेड ; प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्री. बापू दासरी, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर यांची उपस्थिती होती.