प्रा.वसंत डावरे यांचा सन्मान

धर्मापुरी:( प्रा. भगवान अमलापुरे)

 

येथील ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि रासेयोचे द्वितीय कार्यक्रम अधिकारी प्रा वसंतराव रं डावरे यांना महाराष्ट्र गोवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३ नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार, कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला नाट्य उत्सवात ( मालवण २०२३ ) प्रा वसंत डावरे यांना महाराष्ट्र गोवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३ प्रदान करण्यात आला. प्रा वसंत डावरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *