केंद्रप्रमुख सेवापुर्तीचा कार्यक्रम पंचायत समिती लोहा येथे संपन्न

लोहा ; प्रतिनिधी
पंचायत समिती लोहा या कार्यालयामध्ये आपल्या प्रदीर्घ सेवेच्या यशस्वीतेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सेवाजेष्ठ व कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख श्री बी .जी. डफडे साहेब व श्री टी. पी. पाटील साहेब यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती लोहा यांच्या वतीने सेवापूर्ती निमित्य शुभेच्छा व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोहा पंचायत समितीचे आमचे मार्गदर्शनक व आदर्श गट शिक्षणाधिकारी श्री सतीशजी व्यवहारे साहेब हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री सर्जेराव टेकाळे, श्री बी पी गुट्टे साहेब, श्रीमती सरस्वती अंबलवाड मॅडम, तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व मुख्याध्यापक, सर्व विषयतज्ञ, विशेष शिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

या प्रसंगी जि प कें प्रा शा गोलेगाव चे केंद्रिय मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री पि.डी. पोले यांनी दोन्ही ही सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांच्या शैक्षणिक व सामाजिक आणि कार्यात तत्पर ते बद्दल आपल्या मनोगतातुन त्यांचे कार्य उत्कृष्ट पार पडल्या चे अनुभव व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघा चे राज्य उपाध्यक्ष तथा कन्या लोहा चे केंद्रप्रमुख श्री बी जी फसमले सरांनी दोन्ही केंद्रप्रमुखाची कार्यप्रणाली तसेच संघटन कौशल्य यावर विशेष प्रकाश टाकला.

 

 

तर संकुल सुनेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ नांदेड कोषाध्यक्ष श्री मदन नायके सर यांनी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघा चे राज्य उपाध्यक्ष तथा गोलेगाव केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री बी जी डफडे व मी श्रीदत्त अध्यापक महाविद्यालय हदगाव येथे लहानपणापासून एका खोलीत सोबत राहिलो व घडलोत तेथील शैक्षणिक कार्यात आम्ही आघाडीवर असत असे भावनिक उदगार काढून आलेले अनुभव आपल्या रसाळ वाणीत सर्वांसमोर मांडले. श्री सर्जेराव टेकाळे साहेब यांनी या दोन्हीही केंद्रपप्रमुखांनी त्यांच्या सेवेच्या अखेरपर्यंत त्यांचे कार्य जबाबदारी ने पार पडल्याचे सांगुन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून दोन्ही केंद्रप्रमुखांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देवून त्यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले.
सेवापूर्ती सोहळ्याच्या सत्कारास उत्तर देतांना सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांनी हायस्कूल व डि एड मधील घेतलेल्या शिक्षणाची जडणघडण तसेच त्यांच्या 38 ववर्षातील शैक्षणिक, सामाजिक , विज्ञान ,शिष्यवृत्ती व,सांस्कृतिक इ क्षेत्रातील कार्यात मा शिक्षणाधिकारी तथा भुतपुर्व शिक्षण संचालक मा गोविंद नांदेडे साहेब , मा शिक्षणाधिकारी एम आर देशमुख साहेब,मा गट शिक्षणाधिकारी ना ना चवडेकर , सी टी सावते , कै. नारायण बिरादार ,मा सर्जेराव टेकाळे, मा बी पी गुट्टे, मा रवींद्र सोनटक्के साहेब इ च्या सहवासात त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली निष्ठतने ,प्रामाणिकतेने कार्य करता आल्याचे समाधान व्यक्त करून माझे अनेक विद्यार्थी अधिकारी व कर्मचारी व सामाजिक कार्यात आज विविध कार्यालयात व क्षेत्रात उत्कृष्ट रित्या सेवा बजावत असल्याचे सांगितले. या वेळी त्यांचे आदर्श विद्यार्थी मा मोहनराव नळदकर साहेब हे आज अपर जिल्हाधिकारी या महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले.
तसेच दुसरे सत्कारमूर्ती श्री टी पी पाटील यांनी त्यांच्या सेवेच्या कालावधीत बारुळ वरवंट, मारतळा इ ठिकाणी त्यांची प्रा .शिक्षक ते केंद्रप्रमुख विविध पदावरील सेवेत अखंडितरित्या सेवा दिल्याचे व कार्यालयीन काम व अहवाल वेळेवर दाखल करून कार्यालयास सहकार्य केल्याचे मनोगतातुन सांगुन त्यांचे सेवा कालावधीत चुकीच्या बदलीतून दुरूस्ती होवुन प्रशासनाने सोय करून दिल्याचे किस्से सांगितले.
अध्यक्षीय समारोपामध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री व्यवहारे साहेब यांनी या दोघांची कार्यप्रणाली व कार्यकुशलता उत्कृष्ट अनुभवायला मिळाल्याचे सांगुन दोघांनाही पर्यटन व आयु -आरोग्य चांगले लाभो अशा शुभेच्छा दिल्या . सदरिल समारंभाचमध्ये विषयतज्ञ श्री संजय अकोले, व श्री राजू चव्हाण यांना देखील वाढ दिवसाच्या शुभेच्छा देऊन अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन कें प्रा शा शेवडी चे केंद्रप्रमुख श्री नागोराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालाजी बनसोडे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *