फुलवळ सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड.. चेअरमन पदी दत्ता डांगे तर व्हाईसचेअरम पदी संग्राम मुंडे..

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )

 

राजकारणाच्या व राजकीय डावपेचाच्या दृष्टीने माहीर असलेल्या कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सेवा सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून चेअरमन पदी दत्ता माणिकराव डांगे तर व्हाईसचेअरम पदी संग्राम विठ्ठल मुंडे यांची तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांची पण बिनविरोध निवड झाल्याने सर्वच स्तरातून या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

सहकार क्षेत्रातील ता. १ डिसेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या रजिस्टर क्रमांक ४४४ असलेल्या फुलवळ येथील सेवा सहकारी सोसायटी च्या नूतन संचालक मंडळाची नीवड करण्यासाठी ची प्रक्रिया गेल्या मार्च महिन्यात राबविण्यात आली. त्यावेळी अनेक इच्छुकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपापले पॅनल उभे करण्याच्या दृष्टीने व्युव्ह रचना आखण्याचा अतोनात प्रयत्न ही केला. परंतु संबंधित कार्यालयाने ठरवून दिलेल्या तारखेला ठरवून दिलेल्या वेळेत केवळ एकाच पॅनल ने आपल्या सर्व सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि बाकी इच्छुकांनी मात्र आयत्यावेळी काढता पाय घेतला. त्याचवेळी निश्चित झाले होते की या एकाच पॅनल चे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होणार , परंतु कांही औपचारिकता होणे शिल्लक राहिले असल्याने जाहीर करणे थोडे लांबणीवर पडले होते.

आज ता. १२ एप्रिल रोज बुधवारी अखेर तो दिवस उजडला आणि फुलवळ ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्ही. जवादवार , फुलवळ से.स. सोसायटी चे सेक्रेटरी विनायकराव शेळके यांच्या अधिपत्याखाली या सेवा सहकारी सोसायटी ची निवड प्रक्रिया संपन्न झाली. या निवड प्रक्रियेत फुलवळ सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी दत्ता डांगे यांची तर व्हाईसचेअरम पदी संग्राम मुंडे यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. तर या संचालक मंडळात संचालक म्हणून पत्रकार धोंडीबा बाबाराव बोरगावे , मारोती कोंडीबा जेलेवाड , काशिनाथ ग्यानोबा मुंडे , संतोष माधवराव मंगनाळे , शिवदास भीमराव सोमासे , शादुल महेबूब शेख , सूर्यकांत भुजंगराव मंगनाळे , वनमाला केशवराव तुप्पेकर , विद्यावती शिवाजीराव पांचाळ , उद्धव भुजंगा देवकांबळे , गणेश पंडितराव पवार , व्यकंटी किशन शेळगावे आदींची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्ही. जवादवार यांनी जाहीर केले. त्यानंतर माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी संचालक मंडळातील सर्वांचा व उपस्थित अधिकारी गावकरी मंडळी चा भव्य सत्कार केला.

या निवड प्रक्रियेच्यावेळी फुलवळ चे सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे , मुंडेवाडी चे सरपंच ज्ञानोबा मुंडे , फुलवळ से.स.सोसायटी चे सेवक हाजीसाब शेख , ग्यानोबा मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , रमाकांत डांगे , संतोष डांगे , बाळू जेलेवाड , मनोहर जाधव , वजीर निछलकर , संभाजी डांगे , अविनाश डांगे , ऍड. उमर शेख , कामाजी मंगनाळे आदींची उपस्थिती होती.

या निवड प्रक्रियेनंतर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी माझ्यासह माझ्या सर्व संचालक मंडळावर विश्वास दाखवत आशीर्वादरुपी केलेल्या सहकार्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आपण दाखवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही असे कार्य करत सर्वांना सोबत घेऊन आपल्या सोसायटी चा कारभार पारदर्शक चालवू असा विश्वास चेअरमन दत्ता डांगे यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *