पेठवडज सेवा सहकारी सोसायटी संस्था भाजपाच्या ताब्यात तर चेअरमन पदी श्री.व्यंकट तुकाराम पांढरे व व्हॉइस चेअरमनपदी बालाजी गणपती गडमड.

पेठवडज (कैलास शेटवाड)

पेठवडज तालुका कंधार येथील सर्वात मोठी समजली जाणारी विविध सेवा सहकारी सोसायटी संस्था मर्यादित पेठवडज संस्थेची निवडणूक- 2023 ते 2028 या कालावधीसाठी दिनांक 11/4/2023 रोजी पार पडली असून या निवडणुकीत श्री श्याम महाराज किशनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली से.स.सो.संस्था मर्या. स्वाभिमानी शेतकरी शेतमजूर विकास पॅनल उभे होते.

 

तर दुसऱ्या बाजूने श्री.खुशाल आनंदराव राजे व श्री.तानाजी एकनाथ भालेराव व श्री.देविदास संभाजी कारभारी व त्यांचे सहकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी सोसायटी संस्था मर्यादित शेतकरी बचाव पॅनल उभा होते तरी या चुरशीच्या निवडणुकीच्या लढतीत श्री. श्याम महाराज किशनराव जोशी यांचे स्वाभिमानी शेतकरी शेतमजूर विकास पॅनल बहुमताने विजय प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

 

तरी विविध सेवा सहकारी सोसायटी संस्था पेठवडज ही एकूण 13 संचालक मंडळ सदस्याची असून त्यासाठी एकूण दोन्ही पॅनलचे एकूण 26 उमेदवार व एक अपक्ष असे 27 उमेदवार यामध्ये निवडणूक घेण्यात आली होती श्री श्याम महाराज किशनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल ने 13 पैकी 13 संचालक संचालक मंडळ सदस्य शिलाई मशीन या चिन्हावर निवडून आणून विजयी झाले असून एकूण सभासद सभासद मतदार 988 पैकी 695 सभासदांनी मतदान केले असून त्यापैकी 668 मतदान वैद्य ठरले व 27 मतदान बाद झाले असून पहिल्यांदाच चुरशीची लढत झाल्यामुळे 70.74 टक्के मतदान झाले आहे या संचालक मंडळाच्या या अगोदरचे व्हाईस चेअरमन श्री. व्यंकट तुकाराम पांढरे यांनी मागील काळात शेतकऱ्यांना दिलेली पावती सेवा व अहोरात्र बऱ्याच दिवसापासून या निवडणूकी साठी प्रयत्न केले असून त्यांना या गावातील शेतकरी,व सभासदांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या सर्व पॅनल मधील सदस्यांना बहुमताने विजय प्राप्त करून देऊन मतदान करून विजयी केले आहे सदरील संचालक मंडळ 13 सदस्यांचे असून त्यामध्ये श्री.पांढरे व्यंकटी तुकाराम,श्री. गोंधळे गंगाधर बाबाराव,श्री. दामले पंढरी एकनाथ, श्री. कंधार एकनाथ बालाजी,श्री. गडमड बालाजी गणपती,श्री. कंधारे बळी धोंडीबा, श्री. शिंदे माधव हरी, सौ.आस्टुरे जनाबाई हरी, सौ. जोगदंड निलूबाई मारोती श्री.कोरबाड भुजंग नागोराव, श्री.मुंडकर नामदेव शंकर श्री. गायकवाड गंगाधर संभाजी अनुक्रमे असे उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत तरी चेअरमन पदासाठी श्री. व्‍यंकट तुकाराम पांढरे व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री.बालाजी गणपती गडमड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या विजयासाठी कै. शिवाजीराव सदाशिवराव नाईक यांच्या प्रेरणेतून श्री.संभाजी सदाशिव नाईक श्री. भालचंद्र बापूसाहेब नाईक(शिवसेना उपजिल्हाप्रमुख नांदेड तथा माजी. पंचायत समिती सदस्य कंधार, माजी.उपसरपंच ग्रामपंचायत पेठवडज) तसेच श्री.माधवराव रामजी मुगावे श्री.राऊस राजे,श्री. गिरधारी मोतीराम केंद्रे(माजी पंचायत समिती सदस्या पेठवडज प्रतिनिधी), श्री दिगांबर मारोती शेटवाड व श्री.प्रकाश बालाजी कंधारे, श्री.कल्याण संजय पुटवाड,श्री.सोनु(भाऊ)नागोराव तेलवाड व इतर सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले
या निवडणुकीमध्ये बहुमताने विजय झाल्यानंतर पॅनल प्रमुख व संचालक मंडळाचे निवडून आलेल्या सदस्यांचे कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री भालचंद्र बापूसाहेब नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की,ही सोसायटी शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाची संबंधित असणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून अर्थपुरवठा कसा वेळेत करता येईल व महाराष्ट्र शासन सहकार विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी भविष्यकाळात आम्ही व सर्व कार्यकारी मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन प्रयत्नशील राहू व पिक विमा इत्यादी योजना निधी पी.एम.किसान योजनेच्या माध्यमातून व इतर योजना परिसरातील शेतकऱ्यांना कसा लाभ घेता येईल याकडे लक्ष राहील व तसेच श्री.व्यंकट तुकाराम पांढरे व त्यांचे संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या विश्वासाला येत्या पाच वर्षात तडा जाऊ देणार नाहीत असे ग्वाही देऊन सांगितले.
ही निवडणूक प्रक्रिया या अगोदर जेमतेम दोन वेळेस बऱ्याच वर्षांपूर्वी झाली होती पण तिसऱ्यांदा ही निवडणूक अटीतटीची मतदान होऊन पहिल्यांदाच झाली आहे.या निवडणुकीच्या वेळी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आलेले निवडणूक निर्णय अधिकारी येथे श्री.कोकणे साहेब श्रेणी-१ तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले व मतदान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पॅनल यास निकाल प्रत देऊन 988 पैकी 695 मतदान झाले आहे त्यापैकी 668 मतदान वैध व 27मतदान बाद होऊन 70.74 टक्के मतदान झाल्याचे सांगितले
यावेळी पोलीस विभागाचे पोलीस स्टेशन कंधार व पेठवडज पोलीस दूरक्षेत्र पेठवडज येथिल अधिकारी कर्मचारी श्री.लोणीकर साहेब श्री. व्यवहारे साहेब(बीट जमादार पेठवडज) श्री.तुकाराम जुने साहेब व श्री.हराळे साहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संरक्षण बंदोबस्त देऊन सहकार्य लाभल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया समाधानकारक रित्या पार पडली आहे. तरी भविष्यकाळात चेअरमन व्हाईस चेअरमन व नवनिर्वाचित संचालक मंडळ शेतकरी वर्ग गावकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राहून त्यांना सहकार्य व मदत करतील या आशेमुळेच आम्ही सदरील पॅनलला बहुमताने निवडून दिले आहे अशी चर्चा शेतकरी वर्ग सभासद यांचे मधून होत आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *