फुलवळ येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

 

फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )..

 

फुलवळ येथील सेवा सहकारी सोसायटी , ग्राम पंचायत कार्यालय , श्री बसवेश्वर विद्यालय , जि.प.कें. प्रा. शाळा येथे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

 

प्रथमतः येथील सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे , चेअरमन दत्ता डांगे , नागनाथ मंगनाळे , माणिकराव मंगनाळे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे , पत्रकार धोंडीबा बोरगावे , विश्वांभर बसवंते , मधुकर डांगे , शादुल शेख , शिवदास सोमासे , मारोती जेलेवाड , हाजीसाब शेख , परसराम पटणे , रमाकांत डांगे , कैलास मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच येथील ग्राम पंचायत कार्यालयात घटनाकार , बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळा संपन्न झाला. यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विठ्ठलराव तुप्पेकर , रब्बानी शेख , केदार देवकांबळे , हिरकांत मंगनाळे , मनोहर जाधव , बाळू जेलेवाड , विठ्ठल मंगनाळे , व्यंकटी शेळगावे , मंगेश पांचाळ , बालाजी केंद्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *