डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबुलगा येथील क्रिकेट सामन्यांचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते उदघाटन

 

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित आंबुलगा तालुका कंधार येथील क्रिकेट सामन्यांचे उदघाटन आज दि १४ एप्रिल रोजी नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर,कृष्णाभाऊ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी सरपंच तथा कॉग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख सतिश देवकत्ते,शिवम पाटील कुरुळेकर, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे,सरपंच पांडुरंग मुसळे, उपसरपंच सचिन गुद्दे, ग्रामविकास अधिकारी नवघरे, राजु देवकांबळे, किरण आंबुलगेकर,माधव वाघमारे, रंजित ठेंबुरणे, माणिक वडजे,विजय देवकांबळे,सतिश देवकांबळे, विलास आंबुलगेकर, किरण वाघमारे, आदींसह गावातील नागरिक व क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *