राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कंधार येथे अन्नदान

 

कंधार ; भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा सौ.आशताई श्यामसुंदरजी शिंदे यांनी कंधार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतुळ्यास पुष्पहार घालून महामानवाला विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या पदाधिकारी यांच्या वतीने सौ.आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब, ज्ञानेश्वर चोडे क्रषी उत्पन्न बाजार समिती सभापती कंधार, आवधुत पा.शिंदे शेकाप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, पुंडलिक पाटील बोरगावकर सरपंच, शेख शेरु भाई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष, सचिन पा.कुदळकर,आवधुत पा.पेठकर,महेश पिनाटे कंधार शहरप्रमुख शेकाप, व्यंकटी पा.आढाव बोरगावकर,अॅड.मिलींद कल्हाळीकर,रीपाई नेते,अनिल कांबळे रीपाई कंधार तालुका उपाध्यक्ष,व इतर भिमसैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *