आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या वतीने कंधार येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

 

कंधार/ प्रतिनिधी

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो, रमजान महिन्यांमध्ये बहुसंख्येने मुस्लिम बांधव एकत्रित येऊन उपवास करतात, तसेच दानधर्म, जकात, सदका करत मुस्लिम समाजामध्ये सर्व धर्मीय समभावाची भावना रमजानमध्ये मुस्लिम बांधवाकडून दिला जातो, काल दिनांक 14 एप्रिल रोजी कंधार शहरातील छोटी दर्गा येथे लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .

 

या कार्यक्रमास आमदार श्यामसुंदर शिंदे, शेकापच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौंडे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे,शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाईं ,तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर, महेश पिनाटे ,माजी नगरसेवक मन्नान भाई ,पुंडलिक पाटील बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते छोटी दर्गा येथे चादर चढवून आमदार शिंदे यांनी यावेळी दर्शन घेतले ,यावेळी आमदार शिंदे व आशाताई यांचा मुस्लिम बांधवांनी सत्कार केला.

 

यावेळी आमदार शिंदे, आशाताई यांनी पवित्र रमजान निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी सचिन कूदळकर , व्यंकटी आढावा, माजी न.पा. उपाध्यक्ष हमीद भाई, माजी सरपंच आजमोदीन सह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *