अहमदपूरात रविवार दि १६ एप्रिल २३ रोजी कविसंमेलन

अहमदपूर :(प्रा.भगवान आमलापुरे)

 

एप्रिल महिना हा महापुरुषांचा महिना आहे. त्यामुळे कवितांच्या माध्यमातून महापुरुषांचे गुणगान व्हावे म्हणून आज रविवार दि १६ एप्रिल २३ रोजी अहमदपूरात राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षा वर्षा माळी आहेत. उदघाटन भारत सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. तर विद्रोही कवी राजेंद्र कांबळे स्वागताध्यक्ष आहेत. जेष्ठ कवी एन डी राठोड यांच्या संयोजनात होणाऱ्या या कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक आणि कवी राजेसाहेब कदम करणार आहेत. महेंद्र थोरात, मुंबई; अशोक राठोड,चंद्रपूर; गौतम वावरे, गडचिरोली आणि दलित मित्र उत्तम माने या कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनात ज्ञानेश्वर हंडरगुळीकर,चंद्रकांत मोरे, प्रोफेसर एन ए कदम,उदगीर; आबा पांचाळ,वसमत ; डॉ आर के गजलवार ,अहमदपूर ; कवी विजय पवार नांदेड (लिंबोटी) ; राम कदम,सिल्लोड; एस एन नाईकवाडे, उदगीर; डॉ सुशिलकुमार चिमुरे, उदगीर; शोभा चव्हाण ,औसा; बळी आंबुलगे, नांदेड; बालाजी मुंडे, किनगाव; वंदना बांगर, लातूर; व्यंकट सुर्यवंशी, उदगीर; माधव जाधव, कंधार; अनुरत्न वाघमारे, नांदेड; अंकुश सिंदगीकर, शिवाजी स्वामी, उदगीर; वैजनाथ कांबळे, हडोळती ; प्रा संजयकुमार भोसले, चापोली; बालाजी मुंडे चिखलीकर, शिवा कराड, अहमदपूर ;शिवकांता शिंदे, वैजनाथ गित्ते, अहमदपूर; प्रा अनिल चवळे, अहमदपूर; प्रफुल्ल धामणगांवकर, प्राचार्य तुकाराम हरगिले, अहमदपूर; मीना तौर, रंजना गायकवाड, मुरहारी कराड, पारकर; शिवाजी नामपल्ले, लातूर; शाहीर सुभाष साबळे, अहमदपूर; समियोद्दिन अहेमदपुरी, संजय तिडके, गणेश चव्हाण अहमदपूर आणि प्रा भगवान आमलापुरे सहभागी होणार आहेत.

 

सकाळी ११:४५ वाजता पंचायत समितीच्या सभाग्रहात सुरु होणाऱ्या या कविसंमेलनात रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन संयोजक एन डी राठोड यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *