कंधार ; प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा सन उत्सव म्हणजे रमजान हा रमजानच्या महिन्यात दान, धर्म,रोजा म्हणजेच उपवास ठेवून दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करणे, कुराण वाचन करणे एका पुण्याच्या बदल्यात सत्तर टक्के जास्त पुण्य मिळते अशी भावना इस्लाम धर्मात अशी भावना इस्लाम धर्मात मानले जाते.
इस्लाम धर्मात पाच अरकानवर आधारित आहे नमाज, रोजा, जकात,कलमे तोहिद,शक्य असेल तर हज या पैकी रमजान महिन्यात स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, लहान मुलं आपापल्या परीने रमजानचे रोजा म्हणजेच उपवास ठेवून आपल्या धर्माच्या शिकवणीचे पालण करत असतात याच शिकवणीतून कंधार येथील मोहम्मद कबिर अहेमद मोहम्मद सिकंदर या दहा वर्षांच्या मुलाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे कडाक्याच्या उन्हाळ्यात सकाळी साडेचार ते सायंकाळी सहा वाजुन चाळीस मिनिटे जवळपास १२ तासाच्या वर अन्न पाणी या सर्वांना त्याग देऊन उपवास ठेवलं जातं मोहम्मद कबिर या दहा वर्षांच्या मुलाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे सायंकाळी सर्व कुटुंबीय सोबत प्रार्थना करुन रोजा सोडला या वेळी आजोबा मोहम्मद रशिद, पठाण गुलाम हैदर, गुलाम शाहिंदर, मोहम्मद साबेर, शेख मुजाहिद,अथर सरवरी, पठाण अबुतालेब, मोहम्मद सरफराज, मोहम्मद मोईनोद्दिन, शेख मेहराज, शेख खाजामियां,गुलाम रसूल, मोहम्मद कामारान, यांच्या सह आई वडील, बहिणी, मावशी,अत्या यांनी मोहम्मद कबिर याच कौतुक करून शुभेच्छा दिल्या.