आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोह्यात विविध विकास कामांचे उद्घाटन

लोहा /प्रतिनिधी

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर व निधी उपलब्ध झालेल्या लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचारी निवासस्थान व संरक्षक भिंतीचे व अंतर्गत रस्ते बांधकाम 13 कोटी 76 लक्ष रुपये कामाचे व तालुक्यातील जिल्हा सीमा लवराळ, रिसनगाव, लोहा, धावरी रस्त्याची सुधारणा करणे 16 कोटी रुपये कामाचे काल दिनांक 13 एप्रिल गुरुवारी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

 

 

यावेळी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ ‌.आशाताई श्यामसुंदर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव शेटकर, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, शेकापचे जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, बालाजी ईसातकर सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की, लोहा कंधार मतदारसंघातील सर्व गावे वाडी तांड्यावर दर्जेदार रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सिंचन, पिण्याचे स्वच्छ मुबलक पाणी नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून मूलभूत विकास कामासाठी निधीची कदापी कमतरता भासू देणार नसून येणाऱ्या काळात लोहा कंधार मतदारसंघ महाराष्ट्रात मॉडेल मतदारसंघ म्हणून ओळख व्हावी म्हणून मी मतदार संघात मूलभूत विविध विकास कामांच्या माध्यमातून गाव खेडे वाडी तांड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले, यावेळी आमदार शिंदे यांनी सावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर केला .

 

यावेळी शेकापाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी आ. शिंदे यांच्या विविध विकास कामांचा लेखाजोखा स्पष्ट केला,येणाऱ्या काळात लोहा कंधार मतदारसंघात महिला सशक्तिकरणावर जास्तीचा भर राहणार असल्याचे आशाताई यांनी सांगितले, लोहा शहरात व सावरगाव येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या २९ कोटी ७६ लक्ष विविध कामाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी वरील सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर,यावेळी सरपंच दुलेखा पठाण, सरपंच मोहन काका शूर, सरपंच बालाजी सोनवणे, पत्रकार जगदीश कदम, संतोष मुकणर ,राजू भावे सह गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *