पेठवडज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 

प्रतिनिधी (कैलास शेटवाड)

पेठवडज तालुका कंधार येथील गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तसेच पेठवडज गावातील बौद्ध नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सकाळी ठीक 9 वाजता सौ.अनिता दत्ता गायकवाड (सरपंच ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच येथील ग्रामपंचायत पेठवडज कार्यालयात घटनाकार,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास/प्रतिमेस श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी) तसेच श्री. खुशाल आनंदराव राजे(उपसरपंच प्रतिनिधी) श्री.नामदेव डावकोरे(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज)श्री.संभाजी व्यंकटराव डावकोरे(ग्रामपंचायत सदस्या प्रतिनिधी) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व त्यानंतर सर्व बौद्ध अनुयायी पुरुष, महिला,नागरिक यांनी त्रिशरण पंचशील वंदन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
यावेळी श्री.तानाजी एकनाथ भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष पेठवडज तसेच श्री.कैलास शेटवाड (माजी. सरपंच पेठवडज),श्री.देविदास संभाजी कारभारी,व राजरत्न कदम(माजी पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी), रमेश कांबळे साहेब सिद्धार्थ लोहबंदे,पांडुरंग लोहबंदे, मनोहर लोहबंदे,अरुण लोहबंदे,अजय लोहबंदे,आनंदा लोहबंदे(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज)रणजीत वाघमारे,बबन कदम, प्रशांत कारभारी, संभाजी दामले(ग्रामपंचायत सदस्या प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,महिला व पुरुष व ग्रामस्थ व सर्व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *