डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली व त्यांच्यावर असलेले निवडक ग्रंथाचे प्रदर्शन

 

कंधार ; प्रतिनिधी

१४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे 14 एप्रिल रोजी मोहम्मद रफीक सत्तार सह ग्रंथपाल व वाचकांतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

तसेच वाचनालया तर्फे दिनांक:- 15 ते 18/04/ 2023 पर्यंत डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली व त्यांच्यावर असलेले निवड ग्रंथाचे चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी केले.

यावेळी ग्रंथालय कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, श्रीमती कमलबाई जाधव व वाचक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *